IND VS WI : भारतानं वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नमवलं; स्मृती मानधनाचे दमदार पुनरागमन

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 02:53 PM2019-11-07T14:53:13+5:302019-11-07T14:53:31+5:30

whatsapp join usJoin us
INDvsWI: Smriti Mandhana, Jemimah Rodrigues help India win ODI series against WI | IND VS WI : भारतानं वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नमवलं; स्मृती मानधनाचे दमदार पुनरागमन

IND VS WI : भारतानं वन डे मालिकेत वेस्ट इंडिजला नमवलं; स्मृती मानधनाचे दमदार पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील महिला क्रिकेट संघांच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या वन डे सामन्यात भारताने 6 विकेट राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. वेस्ट इंडिजच्या 194 धावांचा पाठलाग भारतीय महिलांनी 42.1 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुखापतीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या स्मृती मानधनानं या सामन्यात धमाकेदार खेळी केली. स्मृतीच्या येण्यानं जेमिमा रॉड्रीग्जची बॅटची चांगलीच तळपली.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 194 धावांत माघारी परतला. कर्णधार स्टेफनी टेलरने 112 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून सर्वाधिक 79 धावा केल्या. तिला सॅसी-अॅन किंग ( 38) आणि हॅली मॅथ्यूज ( 26) यांनी साथ दिली. भारताकडून झुलन गोस्वामी व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन, तर शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.


या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जेमिमा आणि स्मृती यांनी संघाला 141 धावांची सलामी उभारून दिली. जेमिमा 92 चेंडूंत 69 ( 6 चौकार) धावा करून माघारी परतली. स्मृतीनं 63 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 74 धावा केल्या. पूनम राऊत ( 24) आणि मिताली राज ( 20) यांनी छोटेखानी खेळ करून संघाला विजय मिळवून दिला.

या विजयासह भारतीय संघाने आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आगेकूच केली आहे. भारताच्या खात्यात 18 सामन्यांत 20 गुण झाले आहेत. 

Web Title: INDvsWI: Smriti Mandhana, Jemimah Rodrigues help India win ODI series against WI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.