भारतात क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं अतुट आहे... त्यात क्रिकेट हा राष्ट्रीय सण असल्यानं खेळाडूंचे फॅन फॉलोअर्स तर लाखो-कोट्यवधींच्या संख्येनं आहेत. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचा एक वेगळा फॅन फॉलोअर्स आहे. त्यात मुलींची संख्याही अधिक आहेच. पण, आज ज्या भारतीय खेळाडूंवर लाखो मुली फिदा आहेत, त्यांचा बालपणीचा फोटो पाहिल्यावर त्यांच्यावर कोण फिदा झाले नसते. भारतीय संघातील अशाच लाखो दिलो की धडकन असलेल्या खेळाडूचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे. तेव्हाचा आणि आताचा तो पाहून सर्वांना धक्काच बसेल. आता तुम्हीही त्या खेळाडूबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल?

हा खेळाडू भारतीय संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानं 11 कसोटी सामन्यांत 532 धावा आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत. 54 वन डे लढतीत 957 धावा अन् 54 विकेट्स, तर ट्वेंटी-20त 40 सामन्यांत 310 धावा अन् 38 विकेट्स घेतल्या आहेत. या खेळाडूचं नाव आहे हार्दिक पांड्या... हार्दिक पंड्यावर लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली. या सर्जरीनंतर हार्दिकला भेटण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकिण नीता अंबानी गेल्या होत्या. हार्दिकनं शुक्रवारी इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि त्यात त्याला ओळखणंही कठीण होत आहे. आईसोबतचा हो फोटो शेअर करून हार्दिकनं भावनिक पोस्ट लिहिली आहे.

इंस्टाग्रामवर रंगला प्रेमाचा खेळ, हार्दिक पांड्या म्हणतो... फक्त तू आणि तूच!
हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड यांच्यातील सोशल मीडियावरील प्रेमचा खेळ सध्या व्हायरल झाला आहे. त्यात हार्दिकनं फक्त तू आणि तूच असा रिप्लाय दिलेला पाहायला मिळत आहे. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे, त्यात आणखी एकीची भर पडली आहे. या अभिनेत्रीसोबतचं नातं इतकं सीरियस आहे की हार्दिकनं चक्क घरच्यांशी तिची ओळख करून दिली होती. 

रविवारी या दोघांनी प्रेम कबुल केले. नताशा स्टॅनकोव्हिक असे या अभिनेत्रीचे नाव आहे. हार्दिक नताशाला डेट करत असल्याचीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीत तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टीत तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली. या पार्टीत हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. 


नताशानं शनिवारी हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात तिनं हार्दिकचा बेस्ट फ्रेंड असा उल्लेख केला. ''हे वर्ष तुझ्यासाठी चढउताराचे राहिले. तू त्यातही सक्षमपणे उभा राहिलाच, तुझा सार्थ अभिमान. मी तुझ्या नेहमी पाठीशी उभी आहे,''असे नताशानं लिहिले. त्यावर हार्दिकनंही मजेशीर उत्तर दिले. त्यानं लिहिले की,''तुझ्या या शुभेच्छांनी माझ्या चेहऱ्यावर हसू फुलवले. फक्त तू आणि तूच माझ्या चांगल्या-वाईट काळात सोबत राहिलीस, त्याबद्दल तुझे आभार.'' 


 

Web Title: Indian star cricketer shares his childhood pic with mom, know who is he?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.