लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

नेटिझन्सनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 10:44 IST2020-07-01T10:42:57+5:302020-07-01T10:44:06+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian skipper Virat Kohli hilariously trolls KL Rahul over his picture having coffee | लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

'कॉफी विथ करण' कार्यक्रमामुळे हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल हे टीम इंडियाचे शिलेदार चांगलेच अडचणीत सापडले होते. या कार्यक्रमात हार्दिकनं केलेल्या महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानावर प्रचंड टीका झाली आणि त्याची झळ राहुललाही सोसावी लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) या दोघांवर कारवाई केली आणि त्यांना दंडही भरण्यास सांगितले. राहुल पुन्हा एकदा कॉफीमुळे चर्चेत आला आहे आणि यावेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानंही त्याची फिरकी घेतली.

कब्रस्तानमध्ये सराव करायचा टीम इंडियाचा 'हा' शिलेदार; सौरव गांगुलीनं बदललं आयुष्य!

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक आणि राहुल यांनी हजेरी लावली होती. यावेळी मनमोकळ्या गप्पा मारताना हार्दिकनं महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. बीसीसीआयनं हार्दिक व राहुलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावलं. त्यांना आर्थिक दंडही सुनावला. राहुलनं सोशल मीडियावर कॉफी पितानाचा फोटो पोस्ट केला आणि त्यावरून नेटिझन्सनी त्याला ट्रोल केले.



विराट कोहलीनंही त्याला ट्रोल केले. विराटनं लिहिलं... कप घाणेरडा आहे...


 

Web Title: Indian skipper Virat Kohli hilariously trolls KL Rahul over his picture having coffee