निवड समिती प्रमुखांचे धोनीच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स 

कॅप्टन विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवरील पोस्टनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:17 PM2019-09-12T19:17:34+5:302019-09-12T19:17:58+5:30

whatsapp join usJoin us
Indian selector play down ms dhoni retirement's rumours | निवड समिती प्रमुखांचे धोनीच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स 

निवड समिती प्रमुखांचे धोनीच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचे अपडेट्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कॅप्टन विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवरील पोस्टनंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला. कोहलीनं धोनीसोबतचा फोटो शेअर करताना भावनिक मॅसेज लिहिला. त्यामुळे धोनी आज निवृत्ती जाहीर करतो की काय अशी चर्चा रंगली. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी याबाबत महत्त्वाचे अपडेट दिले. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. यावेळी धोनीच्या निवृत्ती बाबत प्रसाद यांना विचारण्यात आले. त्यावर ये म्हणाले," या दिग्गज यष्टिरक्षकाच्या निवृत्तीबद्दल आमच्याकडे अद्या काही अपडेट नाही." 

तत्पूर्वी, धोनीची पत्नी साक्षी हीने मोठा खुलासा केला आहे. या सगळ्या अफवा असल्याचे मत साक्षीने ट्विटरवर व्यक्त केले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या बातमीला पूर्णविराम लागला.


आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनीनं निवृत्त व्हावं, अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला. कोहलीनं इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. 

कॅप्टन कोहलीनं एक भावनिक फोटो शेअर करून धोनीचे आभार मानले आहे.  त्यात त्यानं लिहिले की,''हा सामना मी कधीच विसरणार नाही. ती अविस्मरणीय रात्र होती. माहीनं मला तंदुरुस्तीची चाचणी देत असल्यासारखे पळवले होते.''

Web Title: Indian selector play down ms dhoni retirement's rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.