भारताच्या खेळाडूंनी सोडले पाच झेल; तरीही बांगलादेश झाला पहिल्या डावात फेल

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हातून एक झेल सुटला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:16 PM2019-11-14T16:16:15+5:302019-11-14T16:16:43+5:30

whatsapp join usJoin us
Indian players dropped five catches; Bangladesh failed in the first innings | भारताच्या खेळाडूंनी सोडले पाच झेल; तरीही बांगलादेश झाला पहिल्या डावात फेल

भारताच्या खेळाडूंनी सोडले पाच झेल; तरीही बांगलादेश झाला पहिल्या डावात फेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंदूर : बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या. पण तरीही या सामन्यात तब्बल पाच झेल भारतीय खेळाडूंकडून सुटल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही बांगलादेशचा संघ एवढे जीवदान मिळूनही फेल झाल्याचेच पाहायला मिळाले.

Image

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हातून एक झेल सुटला. तर तब्बल तीन झेल उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हातातून सुटले. एक झेल रहाणे आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा या दोघांनाही घेण्यासारखा होता. पण या दोघांनाही हा झेल टीपता आला नाही.

The Indian bowler didn

तीन चेंडूंत तीन विकेट्स घेऊनही भारतीय गोलंदाजाची हॅटट्रिक झाली नाही, घडलं असं काही...
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सध्या पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. इंदुरमध्ये सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. बांगलादेशच्या सलग तीन चेंडूंत तीन विकेट्स गेल्या, पण तरीही भारतीय गोलंदाजाला हॅटट्रिक मिळाली नसल्याचे पाहायला मिळाले. नेमकं घडलं तरी काय...

क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंमध्ये जर गोलंदाजाने तीन विकेट्स मिळवल्या तर त्याला हॅटट्रिक म्हटले जाते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी तीन विकेट्स मिळवल्या, पण तरीही एका गोलंदाजाला हॅटट्रिक मिळाली नाही. नेमकं घडलं तरी काय...

चहापाना पूर्वीच्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दोन फलंदाजांना बाद केले. त्यानंतर पंचांनी चहापानासाठी खेळ थांबवला. त्यानंतर चहापानानंतरच्या पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केले. याचाच अर्थ सलग तीन चेंडूंवर भारताला तीन विकेट्स मिळाले. पण दोन गोलंदाजांनी ही कामगिरी केली, त्यामुळेच कोणत्याही गोलंदाजाच्या नावावर हॅटट्रिक जमा होू शकली नाही.

 बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला.  ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.  
घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार होती. मोमिनूलची विकेट घेत त्यानं तो पल्ला गाठला. घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत. त्यानंतर शमीनं बांगलादेशचा डाव गुंडाळला. बांगलादेशकडून मोमिनूल हक ( 37) आणि मुश्फिकर रहीम (43) यांनी संघर्ष केला.

Web Title: Indian players dropped five catches; Bangladesh failed in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.