India vs West Indies: विराट सर्वांची 'नोंद' ठेवतो; ऐका अजब सेलिब्रेशनमागची गजब गोष्ट! Video

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 12:14 PM2019-12-07T12:14:01+5:302019-12-07T12:14:28+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: Virat Kohli reveals reason for 'Notebook' celebration after beating windies in first T20I | India vs West Indies: विराट सर्वांची 'नोंद' ठेवतो; ऐका अजब सेलिब्रेशनमागची गजब गोष्ट! Video

India vs West Indies: विराट सर्वांची 'नोंद' ठेवतो; ऐका अजब सेलिब्रेशनमागची गजब गोष्ट! Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटची खेळी अविस्मरणीय ठरलीय, शिवाय त्यानं विजयानंतर केलेलं सेलिब्रेशनही सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. विजय मिळवल्यानंतर विराटनं अनोखं सेलिब्रेशन केलं आणि त्यामागे दोन वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आहे. सामन्यानंतर जेव्हा विराटला याबाबत विचारले असता त्यानं ती गोष्ट सांगितली.


वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. 

त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. 

या सामन्यात विराटनं अजब सेलिब्रेशन केलं. त्यामागचं कारण विराटनं सांगितलं. 
पाहा व्हिडीओ...

 

पाहा दोन वर्षांपूर्वी काय घडलं होतं...

Web Title: India vs West Indies: Virat Kohli reveals reason for 'Notebook' celebration after beating windies in first T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.