जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरणार, पण...

मराहचं पुनरागमन लांबणीवर पडले असा अंदाज माजी निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला होता...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:45 AM2019-12-13T11:45:46+5:302019-12-13T11:46:46+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies : Jasprit Bumrah will bowl to the likes of Virat Kohli and Rohit Sharma at the nets before the second ODI  | जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरणार, पण...

जसप्रीत बुमराह विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मैदानावर उतरणार, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी जसप्रीत बुमरानं दुखापतीमुळे घेतली होती माघारटीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज लवकरच संघात कमबॅक करेल अशी अपेक्षा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जर भुवी वन डे सामन्याला मुकल्यास त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यात भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे. 

तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेणारा बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी बुमराह टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभाग घेणार आहे. तो येथे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेट्समध्ये गोलंदाजी करणार आहे. यावरून तो किती तंदुरुस्त झाला आहे, याची चाचपणी करण्यात येणार आहे. IANSनं तसं ट्विट केलं आहे.


भारताय संघ वन डे - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिखर धवन, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल
वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक
⦁    वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक

Web Title: India vs West Indies : Jasprit Bumrah will bowl to the likes of Virat Kohli and Rohit Sharma at the nets before the second ODI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.