India vs Sri Lanka : शिखर धवनसह आठ खेळाडू संपूर्ण मालिकेला मुकणार; कृणाल पांड्याच्या आले होते संपर्कात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

India vs Sri Lanka: भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी होणारा दुसरा ट्वेंटी-२० सामना स्थगित करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 03:17 PM2021-07-28T15:17:52+5:302021-07-28T15:18:22+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka: Eight players including Shikhar Dhawan to miss the entire series; Get Close Contacts with Krunal Pandya, find out the full list | India vs Sri Lanka : शिखर धवनसह आठ खेळाडू संपूर्ण मालिकेला मुकणार; कृणाल पांड्याच्या आले होते संपर्कात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

India vs Sri Lanka : शिखर धवनसह आठ खेळाडू संपूर्ण मालिकेला मुकणार; कृणाल पांड्याच्या आले होते संपर्कात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तरीही ते मालिकेला मुकणार

India vs Sri Lanka: भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका अनिश्चिततेच्या गर्तेत अडकली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी होणारा दुसरा ट्वेंटी-२० सामना स्थगित करावा लागला. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंना विलगिकरणात जाण्यास सांगितले अन् त्यांचा RT-PCR रिपोर्ट काढण्यात आला. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी या सर्व खेळाडूंना आता उर्वरित मालिकेत खेळता येणार नाही आणि त्यामुळे ही मालिका होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.

कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा?; टीम इंडियासाठी संपूर्ण हॉटेलच केलं होतं बुक, BCCI कन्फ्युज!

कृणालच्या संपर्कात आलेले आठ खेळाडू कोण?
''मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची Rapid Antigen Tests करण्यात आली आणि त्यात कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात 8 खेळाडू आल्याचे सांगितले आहे आणि ते विलगिकरणात आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडूंची RT-PCR टेस्ट होणार आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच जाहीर केला जाईल,''असे बीसीसीआयनं ट्विट करून सांगितले होते. या आठ खेळाडूंमध्ये कर्णधार शिखर धवनचाही समावेश आहे. त्यामुळे जर ही मालिका झालीच तर शिखरसह त्या आठ खेळाडूंना उर्वरित सामन्यांत खेळता येणार नाही, हे स्पष्ट आहे. शिधरसह हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल हे कृणाल पांड्याच्या संपर्कात आले होते.  

कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात

या यादीत पृथ्वी व सूर्यकुमार यांचे नाव असल्यामुळे या दोघांचा इंग्लंड दौराही अडचणीत आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियातील वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे माघारी यावे लागले. त्यांना बॅक अप म्हणून पृथ्वी व सूर्यकुमारची निवड करण्यात आली होती.  शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

ESPNनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका दौऱ्यावर खेळाडूंकडून कोणत्याही प्रकारे बायो-बबल नियमांचे उल्लंघन झालेले नाही. सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, ग्राऊन्समन आणि हॉटेल स्टाफ यांची नियमित कोरोना चाचणी केली जाते. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या बायो बबल नियमांचे सुपरव्हायझर प्रोफेसर अर्जुना डी सिल्व्हा यांनी सांगितले की, कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा, याबाबत मीही संभ्रमात आहे. ही मालिका बंद दरवाज्यात खेळवली जात आहे आणि सुरक्षित बायो बबलमध्ये खेळाडू आहेत, बायो बबल मोडल्याची कोणतीच घटना आहे. हॉटेल स्टाफ यांच्यावरही बंधन होती आणि त्यांचीही नियमित चाचणी केली जाते.''

Web Title: India vs Sri Lanka: Eight players including Shikhar Dhawan to miss the entire series; Get Close Contacts with Krunal Pandya, find out the full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.