India vs South Africa: Rains possibility on first T-20 match | India vs South Africa : पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट

India vs South Africa : पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट

धर्मशाला, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. पण आगामी काही दिवसांमध्ये धर्मशाला येथे पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा ग्राऊंड स्टाफ सध्या चिंतेत आहे. कारण गेले काही दिवस पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सामन्याच्यावेळी जर पाऊस पडला तर कोणती उपाय योजना करावी, जेणेकरून सामना खेळवला जाईल, याचा विचार सध्या ग्राऊंड स्टाफ करत आहे. सध्याच्या घडीला खेळपट्टी ही पावसाच्या पाण्यापासून कशी वाचवता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भारताच्या 'या' तीन खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये तीन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहे. हे तीन खेळाडू कोण, ते जाणून घ्या...

रिषभ पंत : आतापर्यंत भारतीय संघात सर्वात जास्त संधी देण्यात आली आहे ती रिषभ पंतला. पण पंताला या संधीचे सोने करता आलेले नाही. कारण १८ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याला ३०२ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत पंत कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

नवदीप सैनी : भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण केले. आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये त्याने पाच बळी मिळवले आहेत. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते, यावर सर्वांच्या नजरा असतील.

कृणाल पंड्या : आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कृणालने बऱ्याच जणांची मने जिंकली आहेत. या मालिकेत त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.

वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. 15 सप्टेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. उभय देशांमध्ये कसोटीत मात्र आफ्रिकेने 36पैकी 15 सामने जिंकले आहेत, तर केवळ 11 मध्ये त्यांना हार पत्करावी लागली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs South Africa: Rains possibility on first T-20 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.