India vs South Africa, 2nd Test : Team India register largest Test wins against South Africa | India vs South Africa, 2nd Test : दक्षिण आफ्रिकेची नाचक्की; टीम इंडियानं मोडला 9 वर्षांपूर्वीचा विक्रम

India vs South Africa, 2nd Test : दक्षिण आफ्रिकेची नाचक्की; टीम इंडियानं मोडला 9 वर्षांपूर्वीचा विक्रम

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.   

मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा संघ 189 धावांत तंबूत परतला. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 

मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. 2013पासून भारतानं मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 10 मालिका विजयाचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्धचा भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2010मध्ये भारतानं कोलकाता कसोटीत आफ्रिकेवर एक डाव व 57 धावांनी विजय मिळवला होता.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs South Africa, 2nd Test : Team India register largest Test wins against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.