India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 12:49 PM2019-10-05T12:49:28+5:302019-10-05T12:49:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs South Africa, 1st Test : R Ashwin register third the most expensive 7-fors in Tests in India | India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

India vs South Africa, 1st Test : आर अश्विननं 7 विकेट्स घेतल्या, पण टीम इंडियासाठी त्या महाग ठरल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. भारताच्या पहिल्या डावातील 7 बाद 502 धावांच्या प्रत्युत्तरात 431 धावा केल्या. भारतानं 71 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाची सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या डावात रोहित-मयांक जोडीला साजेशी सुरुवात करता आली नाही. मयांक अवघ्या 7 धावा करून माघारी परतला आणि भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसल्या. भारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या, पण त्या टीम इंडियासाठी महागात पडल्या.

पहिल्या डावात रोहितच्या दिडशतकी खेळीनंतर मयांकने केलेल्या विक्रमी द्विशतक झळकावलं. पहिल्या दिवसाच्या बिनबाद 202 धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळात रोहित व मयांकने जोरदार फटकेबाजी केली. रोहितने 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावा केल्या, तर मयांकने 371 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकारांसह 215 धावा केल्या. मयांकचे हे कसोटीतील पहिलेच शतक होते आणि त्याचे त्याने द्विशतकात रुपांतर केले. भारताने 7 बाद 502 धावांवर पहिला डाव घोषित केला.

डीन एल्गर ( 160), फॅफ ड्यू प्लेसिस ( 55) आणि क्विंटन डी कॉक ( 111) यांच्या फटकेबाजीनं आफ्रिकेचा फॉलो ऑन टाळला. सेनूरान मुथूसामीनं नाबाद 33 धावांची खेळी करताना संघाला 431 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताच्या आर अश्विननं 145 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. अश्विनने कसोटीच्या एका डावात पाचवेळा सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. पण, त्याची ही कामिगिरी सर्वोत्तम ठरली नाही. त्यानं इंदौर कसोटीत 2016-17मध्ये 59 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका ( 7/66, नागपूर 2015-16), वेस्ट इंडिज ( 7/83, नॉर्थ साऊंड 2016), ऑस्ट्रेलिया ( 7/103 चेन्नई, 2012-13) या विक्रमांचा क्रमांक येतो. 


शिवाय भारतात सात विकेट्स देण्यासाठी मोजलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमात अश्विनची आजची कामगिरी तिसऱ्या स्थानी येते. यापूर्वी 1949मध्ये दत्तू फडकर यांनी चेन्नई कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध 159 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बी चंद्रशेखर यांच्या 157 धावांत 7 विकेट्स ( वि. वेस्ट इंडिज, मुंबई 1966) यांचा क्रमांक येतो. चौथ्या स्थानावर  ऑस्ट्रेलियाचे जीम हिग्स ( 7/143 वि. भारत, चेन्नई 1979) आणि पाचव्या स्थानावर हरभजन सिंग ( 7/133 वि. ऑस्ट्रेलिया, चेन्नई 2001) यांचा क्रमांक येतो. 

Web Title: India vs South Africa, 1st Test : R Ashwin register third the most expensive 7-fors in Tests in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.