IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. Sri Lanka have won the toss and they've decided to bowl first.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:35 PM2021-07-28T19:35:21+5:302021-07-28T19:55:18+5:30

whatsapp join usJoin us
India vs SL 2nd T20I live : Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Nitish Rana and Chetan Sakariya making their T20I debut for India | IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

IND Vs SL 2nd T20I Live : ९ खेळाडू गमावले तरी टीम इंडिया खचली नाही, चार पदार्पणवीरांसह उतरली मैदानावर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL 2nd T20I Int Live Score : कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारत-श्रीलंका ट्वेंटी-२० मालिकेत गोंधळ उडाला. कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी ते विलगिकरणात असल्यानं त्यांना उर्वरित मालिकेत खेळता येणार नाही. त्यामुळे बीसीसीआयला श्रीलंका दौऱ्यावर नेलेल्या पाच नेट बॉलर्सचा मुख्य संघात समावेश करण्याची घोषणा करावी लागली. अशात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. २००७मध्ये स्कॉटलंडविरुद्ध भारतानं एकाच सामन्यात चार पदार्पणवीर उतरवले होते.  


आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या पारड्यात पडला अन् त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. ( Sri Lanka have won the toss and they've decided to bowl first.) आजच्या सामन्यात देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि चेतन सकारिया या चार खेळाडूंनी पदार्पण केले. 

कोणते ९ खेळाडू मालिकेला मुकणार?
कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल व मनिष पांडे ( Deeepak Chahar, Manish Pandey, Krunal & Hardik Pandya brothers, Manish Pandey, Suryakumar Yadav, Ishan Kishan.) 

राहुल द्रविड नेमकं काय म्हणाला?
टीम इंडिया संकटात असताना राहुल द्रविड नेहमीच संकटमोचकाच्या भूमिकेत दिसला आताही तो तिच जबाबदारी पार पाडत आहे. ९ खेळाडू अचानक मालिकेबाहेर गेल्यानंतर कोणत्याची टीमचे मनोबल खचले असते, परंतु द्रविडनं तसे होऊ दिले नाही. त्याचे ते बोल खेळाडूंमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरत आहेत... राहुल द्रविड म्हणाला, जर भारतीय संघाकडून खेळण्यासाठी तुमची निवड झाली असेल, तर १५ खेळाडू असोत किंवा २०, तुमच्यात अंतिम ११ मध्ये खेळण्याची क्षमत आहे. या प्रत्येकाची निवड ही त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच झाली आहे. 

तो पुढे म्हणाला, कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आज खेळणार नाहीत. आमच्याकडे ११ खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही मैदानावर उतरणार आहोत. संघाचे संतुलन किंचितसे बिघडले आहे. 

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन 
भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया ( India's playing XI: 1. Shikhar Dhawan. 2. Ruturaj Gaikwad. 3. Devdutt Padikkal 4. Sanju Samson. 5. Nitish Rana.6. Bhuvneshwar Kumar. 7. Kuldeep Yadav. 8. Rahul Chahar. 9. Navdeep Saini. 10. Chetan Sakariya. 11. Varun Chakravarty.)

बीसीसीआयची घोषणा....
भारताचे प्रमुख ९ खेळाडू विलगिकरणात असल्यामुळे नेट बॉलर्स इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांची मुख्य संघात निवड झाली आहे. ( The five net bowlers – Ishan Porel, Sandeep Warrier, Arshdeep Singh, R Sai Kishore and Simarjeet Singh - will now be part of the squad for the remaining T20Is) 


 

Web Title: India vs SL 2nd T20I live : Devdutt Padikkal, Ruturaj Gaikwad, Nitish Rana and Chetan Sakariya making their T20I debut for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.