T20 WC, Ind Vs Pak: पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली?

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. पाक विरुद्धच्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाचा रथ तब्बल २९ वर्षांनंतर रोखला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 02:13 PM2021-10-25T14:13:24+5:302021-10-25T14:15:44+5:30

whatsapp join usJoin us
india vs pakistan t20 match virender sehwag slams fans on burning firecrackers after pak victory | T20 WC, Ind Vs Pak: पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली?

T20 WC, Ind Vs Pak: पाकच्या विजयानंतर फटाके फोडल्यानं सेहवाग भडकला, म्हणाला...बंदी कुठं गेली?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2021, India vs Pakistan: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. पाक विरुद्धच्या वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाचा रथ तब्बल २९ वर्षांनंतर रोखला गेला. खेळ म्हटलं की हात-जीत होत असते. पण टीम इंडियाच्या कालच्या पराभवानंतर भारतात काही लोकांनी फटाके फोडल्याची माहिती समोर आली. पाक समर्थकांनी फटाके फोडल्याच्या घटनेबाबत भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवाग यानं संताप व्यक्त केला आहे. भारतात फटके फोडण्याला बंदी असताना मग काल रात्री फटके कसे काय फोडले गेले?, असा सवाल सेहवागनं उपस्थित केला आहे. 

"दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी आहे. पण काल भारताच्या काही भागात पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडले गेले. ते लोक क्रिकेटच्या विजयाचं सेलिब्रेशन करत असतील त्याबद्दल माझं काही बोलणं नाही. पण मग दिवाळीला फटाके फोडण्यावर बंदी कशाला? पर्यावरण रक्षणाचा पाखंडीपणा तेव्हाच का जागा होतो? दिवाळीत सर्व ज्ञान का वाटू लागतात?", असा रोखठोक सवाल सेहवागनं केलं आहे. 

सेहवाग भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज राहिला आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्यात सेहवाग माहीर होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. पाकिस्तान विरुद्धच्या भारताच्या कालच्या पराभवानंतर सेहवागनं पाकिस्ताननं दाखवलेल्या खेळाचं कौतुक केलं होतं. त्यासोबत भारतही मोठ्या दिमाखात पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: india vs pakistan t20 match virender sehwag slams fans on burning firecrackers after pak victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.