India Vs Pakistan, ICC world Cup 2019 Live Score updates & Live Commentary in Marathi | India Vs Pakistan Live Score: भारताचा पाकिस्तानवर 89 धावांनी विजय
India Vs Pakistan Live Score: भारताचा पाकिस्तानवर 89 धावांनी विजय

भारत vs पाकिस्तान लाइव्ह स्कोअरवर्ल्ड कप 2019  : विश्वचषकात बाप हा बापच असतो, हे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्यासामन्यात दाखवून दिले. भारताने तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल कामगिरी करत आपण पाकिस्तानपेक्षा किती कसे सरस आहोत, हे दाखवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावा केल्या. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग पाकिस्तानला करता आला नाही आणि भारताने सातव्या विश्वचषकाच्या सामन्यातही पाकिस्तावर मात करत विजयी परंपरा कायम राखली. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही. डकवर्थ-लुईस नियमांनुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताचा पाकिस्तावर हा सातवा विजय ठरला.

12:21 AM

विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर सातव्यांदा विजय 

11:57 PM

पाकिस्तानला ३०२ धावांचे आव्हान 

10:49 PM

पावसामुळे पुन्हा सामन्यात व्यत्यय


10:39 PM

सर्फराझ अहमद १२ धावांवर आऊट

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमद १२ धावांवर बाद झाला. पाकिस्तानला सर्फराझच्या रुपात सहावा धक्का बसला. 

10:08 PM

शोएब मलिक आऊट 

10:03 PM

मोहम्मद हफिझ आऊट 

09:58 PM

अर्धशतकवीर फखर झमान बाद

अर्धशतकवीर फखर झमानच्या रुपात पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. 

09:52 PM

कुलदीपने उडवला बाबर आझमचा त्रिफळा, पाकिस्तानला दुसरा धक्का 

09:37 PM

पाकिस्तानच्या फखर झमानचे अर्धशतक 

07:32 PM

भारताने पाकिस्तानविरुद्ध केल्या 336 धावा 

07:15 PM

विराट कोहली ७७ धावांवर आऊट 

06:17 PM

पावसामुळे सामना थांबला 

06:15 PM

फक्त एक धाव करून धोनी आऊट 

06:06 PM

विराट कोहलीच्या अकरा हजार धावा पूर्ण 

06:02 PM

मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर पंड्या आऊट

हार्दिक पंड्याच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. पंड्याने १९ चेंडूंत २६ धावा केल्या. 

05:04 PM

रोहित शर्माचे वन डे कारकिर्दीतील हे 24 वे शतक ठरलं. त्यानं 85 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून शतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्ध त्याचे हे दुसरे शतक ठरले. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक आहे.  

04:57 PM

पाहा रोहित शर्माची अर्धशतकी खेळी 

04:46 PM 

04:41 PM 

04:36 PM

भारताचा पहिला धक्का

वाहब रियाझने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानं लोकेश राहुलला बाद केले. राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. राहुलने 78 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 57 धावा केल्या

04:34 PM 

04:27 PM 

04:14 PM 

03:42 PM

सामन्याच्या दहाव्या षटकार रोहित शर्माला बाद करण्याची आयती संधी पाकिस्ताननं गमावली. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना लोकेश राहुलनं खेळपट्टीच्या मधोमध आलेल्या रोहितला माघारी पाठवले. त्याचवेळी पाकिस्तानच्या खेळाडूनं नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. हाच थ्रो यष्टिरक्षकाकडे केला असता तर रोहित बाद झाला असता

 

03:07 PM

पहिलं षटक निर्धाव

02:36 PM

विजय शंकरचे वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण, चौथ्या क्रमांकावर खेळणार 

02:18 PM 

02:02 PM

अशी आहे आजच्या सामन्याची खेळपट्टी 

01:46 PM

पाकिस्तान संघ ओल्ड ट्रॅफर्डवर दाखल 

01:45 PM 

01:44 PM 

01:44 PM 

01:42 PM

सामना होणार का? 

01:40 PM 


Web Title: India Vs Pakistan, ICC world Cup 2019 Live Score updates & Live Commentary in Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.