IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा हा सलग आठवा विजय ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:42 IST2026-01-11T21:39:33+5:302026-01-11T21:42:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs New Zealand 1st ODI Virat Kohli Misses Ton KL Rahul Seals Thrilling Win For Team India vs NZ | IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना

IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना

India vs New Zealand, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिला वनडे सामना अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०० धावा करत टीम इंडियासमोर विजयासाठी ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा अवघ्या २६ धावा करून परतल्यावर विराट कोहली आणि शुभममन गिल जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारी रचली. कर्णधार शुभमन गिल अर्धशतकी खेळी करून परतल्यावर विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला अन् सामन्यात नवा ट्विस्ट आला. पण शेवटच्या षटकात रंगतदार झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदर लंगडत लंगडत खेळताना दिसला. लोकेश राहुल त्याने उत्तम साथ दिली. ४९ व्या षटकात शेवटच्या चेंडूवर प्रत्येक चेंडूवर विजयासाठी धाव करणं अशी परिस्थिती असताना लोकेश राहुलनं षटकार मारत भारतीय संघाला ६ चेंडू आणि ४ गडी राखून सामना जिंकून दिला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रोहितनं विकेट गमावल्यावर गिल-विराटची शतकी भागीदारी

न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर ३९ धावा असताना रोहित शर्मा २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीनं कर्णधार गिलच्या साथीनं मॅच सेट करणारी भागीदारी रचली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०७ चेंडूत ११८ धावांची दमदार भागीदारी रचली. अर्धशतकी खेळीनंतर शुभमन गिल ७१ चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. 

Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...

विराट नर्व्हस नाइंटीचा शिकार, सामन्यात ट्विस्ट

शुभमन गिल बाद झाल्यावर विराट कोहली आणि उप कर्णधार श्रेयस अय्यर जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७६ चेंडूत ७७ धावांची भागीदारी रचली. पण कायले जेमिसन याने कोहलीला ९३ धावांवर बाद केले. कोहली नर्व्हस नाइंटीचा शिकार झाल्यावर सामन्यात ट्विस्ट आले. श्रेयस अय्यरही अर्धशतकासाठी २ धावांची गरज असताना बाद झाला.

KL राहुलनं लंगडत लंगडत खेळणाऱ्या वॉशिंग्टनच्या साथीनं षटकार मारुन संपली मॅच

श्रेयस अय्यरची विकेट गमावल्यावर सामना फसला होता. संघ अडचणीत असताना हर्षित राणाने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला.लोकेश राहुलच्या साथीनं ३१ चेंडूत ३७ धावांची उयुक्त भागीदारी रचताना हर्षित राणाने २३ चेंडूत २९ धावांची उपयुक्त खेळी केली. जड्डू अवघ्या ४ धावांवर माघारी फिरल्यावर दुखापतग्रस्त वॉशिंग्ट सुंदर मैदानात आला. त्याने लोकेश राहुलला उत्तम साथ दिली. शेवटी लोकेस राहुलनं गियर बदलत आपला क्लास दाखवला अन् षटकार मारत भारतीय संघाला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली.
 

Web Title : कोहली-गिल का अर्धशतक, राहुल का छक्का, भारत की रोमांचक जीत

Web Summary : रोहित के जल्दी आउट होने के बाद कोहली और गिल ने भारत की पारी संभाली। राहुल और घायल वाशिंगटन सुंदर ने न्यूजीलैंड के खिलाफ भारत को जीत दिलाई, राहुल ने छक्का मारकर वनडे जीता।

Web Title : Kohli, Gill shine; Rahul's six seals India's thrilling win.

Web Summary : Kohli and Gill's fifties stabilized India's chase after Rohit's early exit. Rahul and injured Washington Sundar then guided India to victory against New Zealand, with Rahul sealing the win with a six in the first ODI.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.