India vs England : भारतानं इतिहास घडवला, पण रवी शास्त्री अन् विराट कोहली यांनी ओढावून घेतली BCCIची नाराजी!

India vs England, BCCI unhappy with Shastri, Kohli: What exactly happened? : भारतीय संघानं सोमवारी ओव्हल मैदानावर इतिहास घडवला. १९७१नंतर टीम इंडियानं प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 10:28 AM2021-09-07T10:28:16+5:302021-09-07T10:28:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs England : BCCI unhappy with Ravi Shastri & Virat Kohli for attending book launch event; Report | India vs England : भारतानं इतिहास घडवला, पण रवी शास्त्री अन् विराट कोहली यांनी ओढावून घेतली BCCIची नाराजी!

India vs England : भारतानं इतिहास घडवला, पण रवी शास्त्री अन् विराट कोहली यांनी ओढावून घेतली BCCIची नाराजी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, BCCI unhappy with Shastri, Kohli: What exactly happened? : भारतीय संघानं सोमवारी ओव्हल मैदानावर इतिहास घडवला. १९७१नंतर टीम इंडियानं प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. रोहित शर्माचे शतक, शार्दूल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी आणि जसप्रीत बुमराहच्या भन्नाट यॉर्करसह अन्य गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर भारतानं हा सामना जिंकला. भारतानं दिलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २१० धावांवर गडगडला. टीम इंडियानं चौथी कसोटी १५७ धावांनी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या कामगिरीचे सर्वच कौतुक करत असताना बीसीसीआय ( BCCI) मात्र मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.

आम्ही जिंकू असे वाटत होते, पण...!; जो रूटनं सांगितला सामना कुठे व कसा गमावला, Video

चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यासह गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारताचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल हेही विलगिकरणात आहेत. त्यामुळे या सर्वांना १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागले आहे आणि पाचव्या कसोटीतही त्यांना सहभागी होता येणार नाही. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर बीसीसीआय रवी शास्त्री व विराट कोहली यांच्यावर नाराज आहेत. या दोघांनीही मागील आठवड्यात बीसीसीआय किंवा इंग्लंड क्रिकेट बोर्डाला ( ECB) कोणतीच कल्पना न देता एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. तेथेच शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ( BCCI unhappy with Shastri, Kohli) 

एक तीर से दो शिकार!; : टीम इंडियानं इंग्लंडला लोळवून पाकिस्तानच्या स्वप्नांचा केला चुराडा!

भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे, तेथे पार पडलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शास्त्रींनी हजेरी लावली होती आणि तेथे बाहेरील पाहुण्यांनाही प्रवेश दिला गेला होता. Sportsmail नं दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री यांच्यासोबत टीम इंडियाचे काही सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते. याबाबत त्यांनी इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाला ( ECB) कोणतीच कल्पना दिली नाही. ''या प्रकरणाचा बीसीसीआय तपास करणार आहे. या घटनेमुळे बोर्डाची मान शरमेनं खाली गेली आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना जाब विचारला जाणार आहे. संघ व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांची भूमिकाही संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं TOI ला सांगितले.  

टीम इंडियाचा वर्ल्ड कपसाठीचा संघ ठरलाय, फक्त काही खेळाडूंवरून लांबलीय घोषणा!

''अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बीसीसीआय ECBच्या संपर्कात आहेत. शास्त्री लवकरात लवकर बरे होण्याची सर्व प्रतीक्षा पाहत आहेत. बुधवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ निवडणार आहे आणि या बैठकीत याही मुद्यावर चर्चा केली जाणार आहे,''असेही अधिकाऱ्यानं सांगितले.  

Web Title: India vs England : BCCI unhappy with Ravi Shastri & Virat Kohli for attending book launch event; Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.