भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या सलामीवीरांना अपयश आले. पण, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. स्मिथ व लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. अॅलेक्स करीनंही स्मिथला साजेशी साथ दिली. पण, टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत सुरेख गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर लगाम लावला. त्यामुळे स्मिथच्या शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला मोठा पल्ला गाठता आला नाही. शमीनं अखेरच्या दोन षटकांत ऑसींच्या फलंदाजांचे त्रिफळे उडवले.

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संयमी सुरुवात केली. पण, मोहम्मद शमीनं चतुराईनं वॉर्नरचा अडथळा दूर केला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर ( 3) यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला 19 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर फिंच आणि स्टीव्ह स्मिथ डाव सावरतील असे वाटले होते, पण या जोडीला समन्वय राखता आला नाही. मोहम्मद शमीनं भारताला दुसरे यश मिळवून दिले.


नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथनं फटका मारल्यानंतर धाव घेण्यासाठी आवाज दिला. फिंचनं तोपर्यंत क्रीज सोडली होती आणि चेंडू भारतीय फलंदाजाच्या हातात असल्याचे दिसताच स्मिथ पुन्ही क्रीजवर परतला. फिंच तोपर्यंत खूप पुढे आला होता आणि त्ला धावबाद व्हावे लागले. त्यानंतर फिंच स्मिथच्या दिशेनं आरडाओरड करताना तंबूत गेला. ऑस्ट्रेलियानं 10 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या. 

स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्मिथनं 63 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या जोडीनं अर्धशतकी भागीदारीचे शतकात रुपांतर करताना ऑसींचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर विराट कोहलीनं स्टनिंग कॅच घेताना लाबुशेनला बाद केले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर लाबुशेन 54 धावांवर माघारी परतला. कोहलीच्या कॅचनं सोशल मीडियावर धुरळा उडवला.

पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करण्यासाठी पाठवलेल्या मिचेल स्टार्कला काही कमाल करता आली नाही. जडेजानं त्यालाही बाद केले. पण, त्यानंतर आलेल्या अॅलेक्स करीनं स्मिथसोबत पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कुलदीप यादवनं ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानं करीला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. करीनं 36 चेंडूंत 35 धावा केल्या. स्मिथनं 117 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे वन डेतील 9 वे शतक ठरले. त्याच्या उल्लेखनीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं समाधानकारक पल्ला गाठला. ऑसींनी 50 षटकांत 9 बाद 286 धावा केल्या. स्मिथनं 132 चेंडूंत 14 चौकार आणि 1 षटकारासह 131 धावा केल्या. 

India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं

पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

Big Breaking : शिखर धवननं दुखापतीमुळे मैदान सोडलं, खेळण्यावर संभ्रम

India vs Australia, 3rd ODI: विराट कोहलीचा स्टनिंग कॅच, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का Video

Web Title: India vs Australia, 3rd ODI: Steve Smith's century, but Team India restrict Australia to a total of 286/9 after 50 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.