India in a strong position in the first Test, Rahane-Kohli's century partnership | रहाणे-कोहलीची अभेद्य शतकी भागीदारी, पहिल्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत
रहाणे-कोहलीची अभेद्य शतकी भागीदारी, पहिल्या कसोटीत भारत भक्कम स्थितीत

ठळक मुद्देवेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीतकर्णधार विराट कोहली आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांची अभेद्य शतकी भागीदारीतिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 260 आघाडी

नॉर्थ साऊंड, अँटिग्वा  - वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 185 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्याबरोबरच तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाची आघाडी 260 पर्यंत पोहोचली आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजचा पहिला डाव 222 धावांत गुंडाळत भारताने पहिल्या डावात 75 धावांची आघाडी घेतली होती. 

आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सुस्थितीत आणले. या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण करताना चौथ्या विकेटसाठी अभेद्य 104 धावांची भागीदारी केली. विराट आणि अजिंक्यने दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताने कॅरेबियन गोलंदाजांवर वर्चस्व राखले. तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली 51 तर अजिंक्य रहाणे 53 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी चहापानापर्यंत भारताने 37 षटकांत 3 बाद 98 धावा केल्या होत्या.  वेस्ट इंडिजला उपहारानंतर बळी मिळवण्यासाठी फार वेळ वाट बघावी लागली नाही. वेस्ट इंडिजच्या रोस्टन चेस याने मयांक अग्रवालला पायचीत केले. त्यानंतर लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे संयमी खेळी करत होते. दोघांनी दुसºया गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. राहुल चुकीचा फटका मारून बाद झाला. त्याला देखील रोस्टन चेस याने बाद केले. त्याने 85 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. पुजारादेखील चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही. केमार रोचच्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने 53 चेंडूत 25धावा केल्या. 

त्या आधी भारताच्या इशांत शर्मा याने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव 22 धावांत गुंडाळला. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर बुमराहने एक बळी मिळवला. वेस्ट इंडिजसाठी रोस्टन चेस (48), कर्णधार जेसन होल्डर (39), जॉन कॅम्पबेल (23), शिमरोन हेटमायेर (35) हे चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकले नाही.


Web Title: India in a strong position in the first Test, Rahane-Kohli's century partnership
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.