Join us

भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 23:02 IST

Open in App

India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल २०२५ चा ५८ वा सामना खराब प्रकाशामुळे रद्द करण्यात आला. सामना अधिकाऱ्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे फ्लडलाइट टॉवरने काम करणे थांबवले, ज्यामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानकडून भारतातील विविध शहरांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला होता. त्यातच स्टेडिममधील फ्लडलाइट्स बंद करण्यात आले असेही सांगण्यात येत आहे. तशातच आता टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे.

पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावामुळे सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी उशिरा अमृतसर आणि पठाणकोटमध्येही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची घोषणा करण्यात आली. या कारणास्तव, सुरक्षेचा विचार करून धर्मशाला शहरात सुरू असलेला सामना थांबवण्यात आला. सामन्यादरम्यान फ्लड लाईटमध्ये बिघाड झाल्यामुळे सुरुवातीला असे वाटले की लाईट बंद झाले आहेत, परंतु नंतर सुरक्षेच्या कारणास्तव संघांना आणि प्रेक्षकांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. अशा परिस्थितीत, बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले आहे आणि खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी उना येथून विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, धर्मशाळेतील हवाई मार्ग बंद करण्यात आला आहे.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरभारत विरुद्ध पाकिस्तानइंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्स