Video : जल्लोष भारत B संघाच्या विजयाचा, चर्चा दिनेश कार्तिकच्या स्टनिंग कॅचची 

भारत B संघाने देवधर चषक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामाचे जेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 04:33 PM2019-11-04T16:33:46+5:302019-11-04T16:34:04+5:30

whatsapp join usJoin us
India B are the champions of Deodhar Trophy 2019-20; Dinesh Karthik pulls off stunning one-handed catch, Video   | Video : जल्लोष भारत B संघाच्या विजयाचा, चर्चा दिनेश कार्तिकच्या स्टनिंग कॅचची 

Video : जल्लोष भारत B संघाच्या विजयाचा, चर्चा दिनेश कार्तिकच्या स्टनिंग कॅचची 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत B संघाने देवधर चषक स्पर्धेच्या 2019-20च्या हंगामाचे जेतेपद पटकावले. भारत B संघाच्या 7 बाद 283 धावांचा पाठलाग करताना भारत C संघाला 9 बाद 232 धावाच करता आल्या. प्रियम गर्गची 74 धावांची खेळी व्यर्थ ठरली आणि भारत B संघाने 51 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यात भारत C संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिनेश कार्तिकच्या स्टनिंग कॅचची चर्चा अधिक रंगली. 

प्रथम फलंदाजी करताना भारत B संघाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 283 धावा चोपल्या. यशस्वी जयस्वाल, केदार जाधव, विजय शंकर यांनी दमदार खेळी केली, परंतु यात के गौथमची फटकेबाजी भाव खावून गेली. भारत B संघाचे सलामीवीर अवघ्या 28 धावांत माघारी परतले. ऋतुराज गायकवाड ( 0) आणि कर्णधार पार्थिव पटेल ( 14) यांना इशार पोरेलने माघारी पाठवले. त्यापाठोपाठ बाबा अपराजितही ( 13) जलाज सक्सेनानं पायचीत झाला. पण, त्यानंतर जयस्वाल आणि केदार यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 79 धावांची भागीदारी केली. जयस्वालने 79 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 54 धावांची खेळी केली. अक्षर पटेलनं ही जोडी तोडली.

नितीश राणा ( 20) पोरेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. विजय शंकरने केदारला तोलामोलाची साथ दिली. केदारने 94 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 86 धावा केल्या. शंकरने 33 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 45 धावा केल्या. या दोघांनाही पोरेलनं माघारी पाठवले. पोरेलनं 43 धावांत पाच विकेट्स घेतल्या. पण, 49व्या षटकात आलेल्या गौथमनं दिवेश पठानीयाच्या एका षटकात तुफान फटकेबाजी केली. त्यानं 3 षटकार व 3 चौकार खेचून 10 चेंडूंत नाबाद 35 धावा केल्या. यातील 26 धावा या दिवेशच्या षटकात खेचल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना मयांक अग्रवाल आणि शुबमन सलामीला आले. पण, शुबमन 1 धाव करून मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर गर्गने एकाकी खिंड लढवली. मधल्या फळीतील फलंदाजांनीही हाराकिरी पत्करली. अक्षर पटेल ( 38), जलाज सक्सेना ( 37) आणि मयांक मार्कंडे ( 27) या तळाच्या फलंदाजांनी संघर्ष केला, परंतु त्यांना भारत C संघाला जेतेपद मिळवून देण्यात अपयश आलं. भारत B संघाने जेतेपदाची माळ गळ्यात घातली असली तरी भारत C संघाच्या कार्तिकनं घेतलेला अफलातून झेल सर्वांच्या लक्षात राहणारा ठरला.

पाहा व्हिडीओ...

 

Web Title: India B are the champions of Deodhar Trophy 2019-20; Dinesh Karthik pulls off stunning one-handed catch, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.