IND vs SA Shubman Gill Doubtful For The Guwahati Test : भारतीय कसोटी क्रिकेटच्या नव्या पर्वात घरच्या मैदानातील दुसऱ्याच मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अल्प धावसंख्येचा बचाव करताना १५ वर्षांनी भारतीय मैदानात कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. गुवाहटीच्या मैदानातील दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघासमोर मालिका बरोबरीत राखण्याचे मोठे आव्हान असेल. या सामन्यातूनही कर्णधार शुभमन गिल संघाबाहेर राहणार का? तो या सामन्याला मुकला तर त्याची जागा कोण घेणार? असे प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
३ चेंडू खेळून कॅप्टन गिलवर आली मैदान सोडण्याची वेळ
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात शुभमन गिल पहिल्या डावात ३ चेंडू खेळल्यावर मैदान सोडले. मानेच्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावातही फलंदाजीला मैदानात उतरला नाही. याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. त्या संघाबाहेर पडल्यामुळे दोन्ही डावात भारतीय संघाला एका खेळाडूची उणीव भासली. जर हे घडलं नसते तर कदाचित सामन्याचा निकाल टीम इंडियाच्या बाजूनं लागला असता. शुभमन गिल याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पण तो दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार की नाही? याच उत्तर अजून तरी गुलदस्त्यातच आहे.
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
गिल दुसऱ्या सामन्याला मुकला तर पंत कॅप्टन्सी करेल, पण...
जर शुभमन गिल दुखापतीतून सावरला नाही तर त्याच्या जागी उप कर्णधार रिषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसेल. पण त्याची उणीव भरून काढण्यासाठी संघ व्यवस्थानप कोणाला संधी देणार? हा एक मोठा प्रश्न असेल. सध्याच्या घडीला साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल दे दोन पर्याय टीम इंडियाकडे उपलब्ध असतील. गिल तंदुरुस्त असला तरी यापैकी एकाची संघात वर्णी लागू शकते. अंतिम निर्णय हा खेळपट्टी पाहूनच घेतला जाईल.
तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोग न पटण्याजोगा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहिल या अंदाजानुसार, टीम इंडियाने कुलदीप यादवच्या रुपात एका प्रमुख फिरकीपटूसह ऑलराउंडरच्या रुपात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रवींद्र जेडजा यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिला. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय समजण्यापलिकडचा होता. कारण तिसऱ्या क्रमांकावर तंत्रशुद्ध बॅटरची गरज असताना टीम इंडियानं या स्थानावर वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय घेतला. कसोटीत पुजारानंतर तिसऱ्या क्रमांकावर अनेक पर्याय आजमावल्यावर साई सुदर्शनला संधी देण्यात आली. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला थेट बाकावर बसवण्यात आले. ही चूक पुन्हा होणार नाही, यावर टीम इंडिया विचार करणार का? तेही पाहण्याजोगे असेल.