कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशीच्या खेळात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतमुळे तीन चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतला. आता बीसीसीआयने त्याच्या दुखापतीसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. गिल पहिल्या कसोटी सामन्यातूनच बाहेर पडला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान शुभमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, गिल अजूनही रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यात पुन्हा मैदानात उतरणार नाही. याआधी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला मानेला झालेल्या तीव्र वेदनांमुळे स्ट्रेचरच्या मदतीने अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत असा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला होता.