भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुन्हा एकदा आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार शो दाखवण्यासाठी सज्ज आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील रांचीच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याआधी रोहित शर्माचा विमानतळावरील एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हिटमॅन रोहितचा रांची विमानतळावरील खास अंदाज चर्चेत
रोहित शर्मा रांची विमानतळावर उतरल्यावर त्याच्याभोवती कडकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. चाहत्यांना आणि पापाराझींना हातवारे करत सुरक्षा कवचातून विमानतळाबाहेर पडत असताना एकजण त्याच्या दिशेनं आला. त्याला रोखण्यासाठी सुरक्षारक्षक लगेच सावध झाले. पण रोहित शर्मानं तो कोणी परका नाही तर आपला मित्रच आहे. तो आम्हाला न्यायला आलाय हे सांगत अगदी कूल अंदाजात सुरक्षारक्षकांचा संभ्रम दूर केला. एवढेच नाहीतर न्यायला आलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकून त्याने दोघांच्यातील मैत्रीची खास झलकही दाखवली.
रोहित नेमकं काय म्हणाला? त्याला रिसीव्ह करायला आलेला मित्र कोण?
सोशल मीडियावर रोहित शर्माचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात रोहितला भेटायला आलेला जो चेहरा दिसला तो दुसरा तिसरा कोणी नसून तो क्रिकेटपटू शाहबाज नदीम आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचा तो संयुक्त सचिव (Joint Secretary) असून भारतीय क्रिकेट संघाचा व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळेच तो विमानतळावर रोहित शर्माला रिसिव्ह करण्यासाठी आला होता. सेक्युरिटी अॅक्शन मोडमध्ये येताच रोहित शर्मानं "अरे भाई ये तो हमारा दोस्त है, ये तो हमारा देखभाल करा है" असे म्हणत खास रिअॅक्शन दिली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. रोहित आधी शाहबाज नदीम हा विराट कोहलीला देखील विमानतळावर नेण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले होते.
IND vs SA: रोहित शर्मासोबत सलामीला कोण? टीम इंडियाकडे 'हे' दोन पर्याय, कुणाला संधी?
रोहितता कसून सराव
३८ वर्षीय रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरचा वनडे सामना खेळला होता. रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी रोहित शर्मानं कसून सराव केल्याचेही पाहायला मिळाले. फलंदाजीसह त्याने क्षेत्ररक्षणावेळीही घाम गाळल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहित शर्मानं ३३ वे वनडे शतक झळकावले होते. पुन्हा एकदा त्याच्याकडून अशाच दमदार खेळीची अपेक्षा असेल.