Virat Kohli Breaks Sachin Tendulkar's Record : न्यूझीलंडविरुद्धच्या राजकोट वनडे सामन्यात रनमशिन विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टरचा आणखी एक विक्रम मागे टाकला आहे. रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावल्यावर विराट कोहली मैदानात उतरला. विराट कोहलीनं खणखणीत चौकार मारून खात उघडले अन् या चौकारासह त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीनं चौकारासह खाते उघडत मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
सातत्यपूर्ण कामगिरीसह विराट कोहलीचा विक्रमी धमाका सुरु असल्याचे दिसते. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १७५० धावांसर अव्वलस्थानी होता. विराट कोहली पहिल्याच वनडेत हा डाव साधेल, असे वाटत होते. पण पहिल्या वनडेत शतकासह अवघ्या एका धावेनं तो विक्रमापासून दूर राहिला. पण दुसऱ्या वनडेत पहिल्याच चेंडूवर त्याने तेंडुलकरला मागे टाकले.
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
आता फक्त रिकी पाँटिंगच राहिला पुढे
क्रिकेट जगतात न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावे आहे. रिकी पाँटिंगनं आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत १९७१ धावा केल्या आहेत. कोहली ज्या फॉर्ममध्ये खेळताना दिसतोय ते पाहता हा विक्रमही त्याच्या अगदी टप्प्यात असल्याचे दिसते.