KL Rahul Century : राजकोटच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियातील आघाडीच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यावर केएल राहुलची बॅट तळपली. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन वर्षांनी त्याच्या भात्यातून शतक पाहायला मिळाले. लोकेश राहुलनं वनडे कारकिर्दीतील आठवे तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिसरे शतक झळकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकी खेळीसह सेलिब्रेशनसह लुटली मैफील
पहिल्या वनडेत षटकारासह मॅच जिंकून देणाऱ्या लोकेश राहुलनं षटकार मारत शतक साजरे केले. शिट्टी मारून खास अंदाजात त्याने या क्लास सेंच्युरीचं सेलिब्रेशन केले. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर लोकेश राहुलकडे कसोटीत सलामीवीराची भूमिका सोपवण्यात आली आहे. पण वनडेत अजूनही बॅटिंग ऑर्डरमध्ये तो कितव्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित नाही. कुठंही खेळवा, पण टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवा, या विचारासह तो आपल्यातील क्लास दाखवून देताना दिसते. त्यामुळेच त्याची ही शतकी खेळी आणखी क्लास ठरते.
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
वनडेत पाचव्या क्रमांकावर सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
केएल राहुलनं सलामीवीराच्या रुपात वनडेत २३ डावात ४३.६ च्या सरासरीसह ९१५ धावा काढल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तो फक्त ३ सामने खेळला असून या क्रमांकावर त्याने २५.७ च्या सरासरीसह फक्त ७७ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर १३ डावात त्याने ५५.८ च्या सरासरीसह ५५८ धावा केल्या असून पाचव्या क्रमांकावर तो सर्वात यशस्वी राहिला आहे. या क्रमांकावर ३३ डावात त्याने ५९ च्या सरासरीसह १३६५ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. सहाव्या क्रमांकावर त्याने ४७.४ च्या सरासरीसह १२ डावात ३३२ धावा केल्या आहेत.