ऑस्ट्रेलियात व डे मालिका आटोपल्यानंतर पाच दिवसांत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी दाखल झाला हे विशेष. याच वर्षाी ऑक्टोबरमध्ये होणाºया टी-२० विश्वचषकाआधी सर्वोत्कृष्ट संयोजनाचा वेध घ्याचा असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन निवडीत सातत्य आणण्याच्या प्रयत्नात आहे. शिखर धवन, हार्दिक पांड्या, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार हे जखमी असले तरी राखीव खेळाडूंनी स्त:ची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळे दिग्गजांची उणिव जाणवली नाही. धवनचा पर्याय म्हणून लोकेश् राहुल याने विंडीजविरुद्ध शनदार कामगिरी केली. धवन परतला तेव्हा राहुलसोबत चांगली सलामी जोडी बनल्याने रोहितला विश्रांती देण्यात आली. 
LIVE
Get Latest Updates
03:48 PM
भारताचा सहा विकेट्स राखून सहज विजय
03:42 PM
श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक
03:09 PM
भारताला मोठा धक्का, विराट कोहली आऊट
02:57 PM
भारताचे शतक आणि लोकेश राहुलचे अर्धशतक
02:28 PM
न्यूझीलंडचे भारतापुढे २०४ धावांचे आव्हान
01:25 PM
न्यूझीलंडला तिसरा धक्का
01:15 PM
कॉलिन मुनरोचे अर्धशतक
01:02 PM
न्यूझीलंडला पहिला धक्का
12:13 PM
भारताने नाणेफेक जिंकली