IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती

लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी निश्चितच आव्हानात्मक होती. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 23:28 IST2025-07-14T23:03:36+5:302025-07-14T23:28:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Reason For Indias Loss 3rd Test At Loards Karun Nair Shubman Gill Yashasvi jaiswal Flop Show | IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती

IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड-भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आला. ऐतिहासिक मैदानात १९३ धावांचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडिया मालिकेत २-१ अशी आघाडी घेईल, अशी अपेक्षा होती. पण बॅटिंगमधील फ्लॉपशोनं गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले. पहिल्या दोन कसोटी सामन्यात बॅटिंगमध्ये जी धमक दिसली ती अचानक गायब झाली. लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी निश्चितच आव्हानात्मक होती. पण टीम इंडियासाठी १९३ धावा फार नव्हत्या. टीम इंडियातील युवा ऑल राउंडरसह चार फलंदाजांपैकी एकाने बॅटिंगवेळी बुमराह-सिराज यांच्याप्रमाणे  'दम' दाखवला असता तर टीम इंडियाला लॉर्ड्सचं मैदाना अगदी आरामात मारता आलं असते.     

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 
सर्वात मोठा खलनायक ठरतोय हा गडी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या करुण नायरला इंग्लंड दौऱ्यावर कमबॅकची मोठी संधी मिळाली. पण पहिल्या तीन कसोटी सामन्यातील ६ डावात तो सातत्याने अपयशी ठरला. पहिल्या दोन कसोटी सामन्यातील त्याचा फ्लॉप शो तिसऱ्या सामन्यातही कायम राहिला. पहिल्या डावात ४० धावा केल्यावर दुसऱ्या डावात तो फक्त १४ धावा करून माघारी फिरला. "डिअर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" असं म्हणत ८ वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर त्याचा फ्लॉप शोचा सिलसिला संघााठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. सरफराज खान आणि श्रेयस अय्यर या तगड्या बॅटर्संना डावलून त्याच्यावर भरवसा दाखवण्यात आलाय. पण दोन कसोटीतील फ्लॉप शोनंतर आता तिसऱ्या कसोटीतही तो टीम इंडियाच्या पराभवामागचं कारण ठरला.

IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

यशस्वी जैस्वालनंही वाढवलं टेन्शन

युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालनं इंग्लंड दौऱ्याची सुरुवात एकदम दिमाखदार केली. पण तिसऱ्या आणि मालिकेतील महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात तो दोन्ही डावात अपयशी ठरला. पहिल्या डावात ८ चेंडूत १३ धावा करून परतलेल्या यशस्वी जैस्वालला दुसऱ्या डावात खातेही उघडता आले नाही. दोन्ही वेळा त्याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर विकेट फेकली. अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना जो संयम दाखवण्याची गरज होती तो त्याने दाखवला नाही.  


 शुबमन गिलच्या भात्यातूनही नाही आली अपेक्षित खेळी

लॉर्ड्सच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळताना शुबमन गिल दोन्ही डावांत अपयशी ठरला. पहिल्या डावात १६ धावांवर माघारी फिरलेल्या गिलवर दुसऱ्या डावात मोठी जबाबदारी होती. चौथ्या दिवसाअखेर यशस्वी जैस्वाल आणि करुण नायर या दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यावर तो मैदानात उतरला. पहिल्या कसोटी सामन्यात शतक आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळीसह शतकी कामगिरी करणारा गिल दुसऱ्या डावात फक्त एका धावेची भर घालून तंबूत परतला. चौथ्या दिवसाच्या अखेरीस त्याची विकेट अल्प धावसंख्येचा बचाव करण्यासाठी इंग्लंडच्या ताफ्यातील गोलंदाजांना बळ देणारी होती. 

नितीश कुमार रेड्डी

भारतीय संघातील युवा अष्टपैलून नितीश कुमार रेड्डीनं तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजीत धमक दाखवली. एवढेच नाही तर पहिल्या डावात ९१ चेंडूत ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळीही त्याच्या भात्यातून पाहायला मिळाली. हाच अंदाज दुसऱ्या डावातही अपेक्षित होता. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पंत पाठोपाठ केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर तंबूत परतल्यावर नितीश कुमार रेड्डीकडून अपेक्षा होत्या.  ५३ चेंडूचा सामना करून तो सेटही झाला. पण मोकच्या क्षणी त्याने आपली विकेट गमावली. इथं सामना इंग्लंडच्या बाजूनं वळला.

Web Title: IND vs ENG Reason For Indias Loss 3rd Test At Loards Karun Nair Shubman Gill Yashasvi jaiswal Flop Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.