भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मोंटी पनेसरने भारतीय क्रिकेटपटूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा भारताचा आघाडीचा गोलंदाज बुमराहपेक्षाही चांगला गोलंदाज असल्याचे म्हटले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेआधी मोंटी पनेसरने इनसाईड स्पोर्ट्सला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान पनेसर याला अँडरसन आणि बुमराह यांच्यातील सर्वोत्तम गोलंदाज निवडण्यास सांगितले. त्यानंतर पनेसर यांनी बुमराहऐवजी जेम्स अँडरसनचे नाव घेतले. पनेसर म्हणाला की, कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अँडरसनचे नाव घेईल. अँडरसनने सर्व परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केली असून तो बुमराहपेक्षाची चांगला गोलंदाज आहे.
जेम्स अँडरसनची कारकिर्द
जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. अँडरसनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ७०४ विकेट्सची नोंद आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अँडरसनने १९४ सामने खेळले आहेत आणि २६९ विकेट्स घेतले आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनने १८ विकेट्स घेतले.
जसप्रीत बुमराहची कारकिर्द
बुमराहने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४५ कसोटी सामन्यांमध्ये २०५ विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर, बुमराहने ८९ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १४९ विकेट्स घेण्याचा विक्रम केला. याशिवाय, जसप्रीत बुमराहने ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेतले.
बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी
भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत बुमराहला इतिहास रचण्याची संधी असेल. बुमराह दोन विकेट घेण्यात यशस्वी झाला तर तो सेना (साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आशियाई गोलंदाज बनेल. सध्या, वसीम अक्रम हा सेना देशांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. वसीमने सेना देशांमध्ये एकूण १४६ विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी बुमराहने आतापर्यंत सेना देशांमध्ये एकूण १४५ विकेट घेऊन चमत्कार केला आहे.
Web Title: IND vs ENG: Monty Panesar on India vs England Test Series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.