Mukesh Kumar Wearing 18 No Jersey Pics Goes Viral : क्रिकेटच्या मैदानात १८ नंबरची जर्सी दिसली की, सर्वांत आधी आठवतो तो किंग कोहली. इंग्लंड दौऱ्यावर १८ नंबर जर्सीचा रुबाब दिसणार नाही. कारण विराट कोहलीनं या दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीये. पण सध्या सोशल मीडियावर १८ नंबरच्या जर्सीची चर्चा सुरु आहे. यामागचं कारण आहे आतापर्यंत ज्या १८ क्रमांकाच्या जर्सीत विराट कोहलीला पाहिलं त्या जर्सीत भारत 'अ' संघाकडून एक दुसरा खेळाडू मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. कोण आहे तो खेळाडू अन् कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याला १८ क्रमाकांची जर्सी कशी मिळाली? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तो १८ क्रमांकाची टेस्ट जर्सी घालून मैदानात उतरला अन्...
अभिमन्य ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर अनौपचारिक कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय 'अ' संघाने इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या अनौपचारिक कसोटीत आपली छाप सोडलीये. करूण नायरचं द्विशतक २०४ (२८१) आणि सरफराज खान ९२ (११९)आणि ध्रुव जुरेल ९४ (१२०) यांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड लायन्स संघासमोर पहिल्या डावात सर्व बाद ५५७ धावा केल्या. भारतीय संघातील खेळाडूंच्या दमदार कामगिरीशिवाय या सामन्यातील मुकेश कुमारचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात तो १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते. विराट कोहलीची जर्सी त्याला कशी मिळाली? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थितीत करण्यात येत आहे. बीसीसीआयने मुकेश कुमारला आयकॉनिक क्रमांकाची जर्सी घालायला परवानगी दिलीच कशी? असाही संतप्त सवाल करण्यात येत आहे.
IND vs ENG : नायर ऑन फायर! इंग्लंडमधील द्विशतकी खेळीसह पठ्ठ्यानं किंग कोहलीच्या जागेवर टाकला 'रुमाल'
अजून तरी हा जर्सी क्रमांक रिटायर्ड करण्यात आलेला नाही
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर अनुक्रमे १८ क्रमांकाची आणि ४५ क्रमांकाची जर्सी रिटायर्ड करावी, असा ट्रेंड पाहायला मिळाला होता. पण अद्याप अधिकृतरित्या या क्रमांकाची जर्सी रिटायर्ड करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दोन्ही दिग्गज अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असून वनडेत ते खेळताना दिसणार आहेत. त्यामुळेच हा निर्णय आताच घेता येणार नाही हे त्यामागचं एक कारण आहे.
मुकेश कुमार १८ क्रमांकाची जर्सी घालून कसा काय मैदानात उतरला?
आंतरारष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्ये १८ क्रमांकाची जर्सी ही विराट कोहलीसाठीच राखीव आहे. दुसरीकडे मुकेश कुमार हा ४९ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय 'अ' संघाकडून खेळताना १८ क्रमांकाच्या जर्सीवर तुर्तास तरी काही बंधन नाही. कदाचित त्यामुळेच मुकेश कुमार १८ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरला असावा. आतापर्यंत बीसीसीआयने फक्त सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी आणि महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमाकांची जर्सी अधिकृतरित्या रिटायर्ड घोषित केली आहे. या क्रमांकाची जर्सी युवा क्रिकेटरला वापरता येत नाहीत.
Web Title: IND vs ENG England Lions vs India A 1st Unofficial Test Mukesh Kumar Wearing 18 No Jersey After Virat Kohli Test Retirement Pics Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.