IND vs ENG, 2nd T20, Michael Vaughan : BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन

IND vs ENG, 2nd T20 : सूर्यकुमार यादवनं १०१ आयपीएल सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 संघात पदार्पण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 07:37 PM2021-03-14T19:37:12+5:302021-03-14T19:37:34+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd T20 : BCCI Took Advice And Got More Mumbai Indians Players Involved: Michael Vaughan Reacts   | IND vs ENG, 2nd T20, Michael Vaughan : BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन

IND vs ENG, 2nd T20, Michael Vaughan : BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : पहिल्या ट्वेंटी-20 तील पराभवानंतर टीम इंडियाच्या संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) संघ चांगला आहे, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं व्यक्त केलं होतं. त्यावर भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं सडेतोड उत्तर दिले होते. आता दुसऱ्या ट्वेंटी-20त सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिल्यानंतरही वॉननं मजेशीर ट्विट केलं. ind vs eng 2nd t20 Live match today score

सूर्यकुमार यादवनं १०१ आयपीएल सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 संघात पदार्पण केलं. यापूर्वी अंबाती रायुडू ( ८१ सामने) व मनीष पांडे ( ६७ सामने) यांना टीम इंडियात पदार्पणासाठी अधिक काळ प्रतिक्षा पाहावी लागली होती. मायकेल वॉननं ट्विट केलं की,''बीसीसीआयनं माझा सल्ला ऐकला आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना संधी दिली.''  Ind Vs Eng 2nd T20 Match Today, Ind Vs Eng 2nd T20 Live Match

टीम इंडियाचे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हे दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून (  Ind Vs Eng 2nd T20 Live Score) पदार्पण करणार आहेत. शिखर धवन आणि अक्षर पटेल ( Shikhar Dhawan and Axar Patel out) यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी इशान व सूर्यकुमार या दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ( Ishan Kishan and Suryakumar Yadav in). इशान व लोकेश राहुल ही जोडी आज सलामीला उतरणार आहे. ( Ishan will open with KL Rahul) 

भारतीय संघ (Playing XI): लोकेश राहुल, इशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.


इंग्लंडच्या संघात टॉम कुरणचे पुनरागमन झाले आहे, मार्क वूडला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. 
इंग्लंडचा संघ  (Playing XI):  जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद 

Web Title: IND vs ENG, 2nd T20 : BCCI Took Advice And Got More Mumbai Indians Players Involved: Michael Vaughan Reacts  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.