Ind vs Ban, 2nd Test: wriddhiman saha done wicket's century in first day night match | Ind vs Ban, 2nd Test : पहिल्या डे नाइट सामन्यात वृद्धिमान साहाने केला पराक्रम
Ind vs Ban, 2nd Test : पहिल्या डे नाइट सामन्यात वृद्धिमान साहाने केला पराक्रम

कोलकाता : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये ऐतिहासिक सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने इतिहास रचला आहे. पण त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने एक पराक्रम केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Image result for wriddhiman saha catch in test

या सामन्यात इशांतच्या गोलंदाजीवर वृद्धिमानने एक अप्रतिम झेल टिपत बांगलादेशच्या महमुदुल्लाहाला बाद केले. हा झेल पकडल्यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीही चांगलाच खूष झाल्याचे पाहायला मिळाले.

Image result for wriddhiman saha catch in test

साहाने हा अप्रतिम झेल पकडला आणि तो कौतुकाचा धनी ठरला. पण या झेलबरोबर त्याले एक अनोखे शतकही साजरे केले. या झेलसह विकेट्स मागे शंभर बळी मिळवण्याचा पराक्रम साहाने यावेळी केला आहे.

 

ऐतिहासिक सामन्यात इशांत शर्माने रचला विक्रम
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिल्या डे नाइट कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत उपहारापर्यंत बांगलादेशच्या सहा फलंदाजांना ७३ धावांत गुंडाळल्याचे पाहायला मिळाले होते.

भारताच्या गोलंदाजांनी गुलाबी चेंडूच्या मदतीने अचूक आणि भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांची फे फे उडवल्याचे पाहायला मिळाले. इशांत शर्माने या सामन्यात एक इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले.

भारताला पहिल्या सहा षटकांमध्ये एकही यश मिळाले नव्हते. पण इशांतने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशच्या इम्रुल कायेसला पायचीत पकडले आणि इतिहास रचला गेला. भारताकडून गुलाबी चेंडूने खेळताना पहिला बळी मिळवण्याचा मान इशांतला मिळाला आणि इतिहास रचला गेला.

Web Title: Ind vs Ban, 2nd Test: wriddhiman saha done wicket's century in first day night match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.