India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 9, 2021 03:46 PM2021-02-09T15:46:56+5:302021-02-09T16:09:47+5:30

whatsapp join usJoin us
IND v ENG, 1st Test: ‘Our intensity was not up to the mark’, Virat Kohli after loss in Chennai Test | India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

India vs England, 1st Test : चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test : पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई कसोटीत यजमान टीम इंडियाला सर्व आघाड्यांवर पाणी पाजलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतर कर्णधार जो रूटनं ( Joe Root) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर द्विशतक झळकावून धावांचा डोंगर उभा केला. तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीनं गोलंदाजांना साथ देण्यास सुरुवात केली आणि इंग्लंडनं भारताचा पहिला डाव गुंडाळून २४१ धावांची आघाडी घेतली. भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडला १७८ धावांत गुंडाळले, परंतु पहिल्या डावातील पिछाडीमुळे टीम इंडिया बॅकफूटवर फेकली गेली. त्यात फलंदाजांच्या अपयशानं इंग्लंडचा विजय पक्का केला. जेम्स अँडरसन ( James Anderson) आणि जॅक लिच ( Jack Leach) यांनी भारताचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळून २२७ धावांनी विजय मिळवला व १-० अशी आघाडी घेतली. बारातियों का स्वागत हम...!; लग्न मंडपात भारत-इंग्लंड सामन्याचे थेट प्रक्षेपण

या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) म्हणाला की, ''आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. ''सामन्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही इंग्लंडच्या फलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात अपयशी ठरलो. जलदगती गोलंदाज, आर अश्विन आणि गोलंदाजी विभागानं पहिल्या डावात चांगली कामगिरी केली, परंतु त्यांच्या धावा रोखून त्यांच्यावर दडपण निर्माण करू शकलो असतो. ही संथ खेळपट्टी होती आणि गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. त्यामुळे फलंदाज स्ट्राईक सतत बदलत होते आणि सामन्यावर पकड घेत होते.'' टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण

विराटनं यावेळी पाहुण्यांच्या फलंदाजांचे कौतुक केले. तो म्हणाला, ''पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून काहीच मदत मिळाली नाही. पण, म्हणून इंग्लंडच्या फलंदाजांकडून श्रेय हिस्कावून घ्यायचे नाही. त्यांनी चतुर खेळ केला. आमची देहबोली आणि जिंकण्यासाठीची तीव्रता कमी पडली. याउलट इंग्लंडनं अधिक प्रोफेशनली खेळ केला. ''  टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के; २२ वर्षानंतर चेन्नईत पराभव अन् गमावले जागतिक कसोटीतील अव्वल स्थान!

आघाडीच्या फलंदाजांचे कान टोचले... 
पहिल्या डावाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही चांगली कामगिरी केली, परंतु आघाडीच्या चार फलंदाजांनी निराश केले. याचा विचार करायला हवा आणि सुधारणा करायला हवी. इंग्लंडच्या फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली, असेही विराट म्हणाला. इंग्लंड-भारत यांच्यातला दुसरा सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच होणार आहे.  ५ ओव्हर्स, ३ मेडन, ६ धावा अन् ३ विकेट्स; जेम्स अँडरसन जोमात, टीम इंडिया कोमात! 

पाहा व्हिडीओ

Web Title: IND v ENG, 1st Test: ‘Our intensity was not up to the mark’, Virat Kohli after loss in Chennai Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.