ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर!

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा  संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे आणि अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 12:31 PM2019-07-05T12:31:05+5:302019-07-05T12:39:49+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Trouble in paradise for Australia as Glenn Maxwell rushed to hospital; Shaun Marsh ruled out tournament | ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर!

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के, एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा  संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे आणि अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे. पण, उपांत्य फेरीत तगड्या संघाचा सामना करण्यापूर्वीच ऑसी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. पाच वेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत इंग्लंड किंवा न्यूझीलंड यापैकी एकाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पण, त्यांच्या दोन तगड्या फलंदाजांना दुखापतीनं ग्रासलं आहे. त्यामुळे एकाला हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली, तर एकाने स्पर्धेतूनच माघार घेतली.

ऑस्ट्रेलियाला अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे. पण, या सामन्यापूर्वी फलंदाज शॉन मार्शला वर्ल्ड कप स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली आहे. सराव सत्रात त्याच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यासह अष्पपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यालाही सराव सत्रात दुखापत झाली. मार्शच्या मनगटाला झालेली दुखापत गंभीर असून त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. मॅक्सवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असला तरी त्याच्या दुखापतीबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

नियमित सराव करत असताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मार्शला ही दुखापत झाली. दुसरीकडे मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलला दुखापत झाली. ''सराव सत्रात मार्शच्या उजव्या हाताला दुखापत झाली आणि दुर्दैवाने त्याच्या मनगटावर सर्जरी करावी लागणार आहे,'' असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,'' हा ऑस्ट्रेलियन संघासाठी मोठा धक्काच आहे. तो लवकरच तंदुरूस्त व्हावा ही प्रार्थना.''  

मार्शच्या जागी पीटर हँड्सकोम्बला मिळाली संधी
शॉन मार्शने माघार घेतल्यानंतर त्याला बदली खेळाडू म्हणून पीटर हँड्सकोम्बला बोलवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही हँड्सकोम्बच्या समावेशाला परवानगी दिली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दौऱ्यात हँड्सकोम्बने मधल्या फळीत दमदार कामगिरी केली होती. 

Web Title: ICC World Cup 2019 : Trouble in paradise for Australia as Glenn Maxwell rushed to hospital; Shaun Marsh ruled out tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.