ICC World Cup 2019 : Picture of MS Dhoni spitting out blood goes viral, Here's what happened | ICC World Cup 2019 : धोनीच्या थुंकीतून रक्त... जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य!
ICC World Cup 2019 : धोनीच्या थुंकीतून रक्त... जाणून घ्या 'त्या' फोटोमागचं सत्य!

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीवर सध्या टीकेची झोड उठत आहे. त्याच्या संथ खेळावर क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूंनीही आक्षेप नोंदवला आहे.  धावा घेण्यासाठी धोनीला संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, आणखी एका कारणानं धोनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत 37 वर्षीय धोनीच्या थुंकीतून रक्त पडतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताला हा सामना गमवावा लागला होता.

इंग्लंडविरुद्ध 338 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातच निराशाजनक झाली.  सलामीवीर लोकेश राहुल ( 0) माघारी परतल्यानंतर तिसऱ्या षटकात कोहली मैदानावर आला. धावांचा पाठलाग करण्यात सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून कोहली ओळखला जातो. त्यामुळे रोहित शर्मासह तो संघाला विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. या दोघांनी जवळपास 25 षटकं खेळून काढली. या जोडीनं जवळपास 5.30 च्या सरासरीनं धावा केल्या. 

त्यापाठोपाठ रोहितही शतक झळकावून माघारी परतला. कोहली बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 9.55च्या सरासरीनं धावा करण्याची आवश्यकता होती.  धोनी जेव्हा मैदानावर आला  तेव्हा भारताची अवस्था 4 बाद 226 अशी होती आणि त्यांना 65 चेंडूंत 112 धावांची गरज होती. म्हणजे 10.34च्या सरासरीनं धावा करायचे होते. तरीही धोनी संथ खेळ केला. त्यानं 32 चेंडूंत 41 धावा केल्या. भारताला विजयासाठी 31 धावा कमी पडल्या.

या सामन्यात धोनीला दुखापत झाल्याचे कुणाला लक्षातही आले नाही. दुखापत होऊनही धोनी मैदानावर टिकून राहिला. या सामन्यात धोनीच्या अंगठ्याला दोनवेळा दुखापत झाली. एकदा यष्टिरक्षण करताना आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करताना. फलंदाजी करताना धोनीच्या थुंकीतून रक्त पडतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेच वातावरण होतं. पण, अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून ते रक्त येत होते, धोनीनं तो अंगठा चूपला आणि त्यानंतर त्यानं थुंकले. त्यामुळेच त्याच्या थुंकीतून रक्त पडत होते.  

Web Title: ICC World Cup 2019 : Picture of MS Dhoni spitting out blood goes viral, Here's what happened
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.