ICC World Cup 2019: England beat Australia in semi final and enter in final of WC | ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता गाठ न्यूझीलंडशी
ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवत इंग्लंड अंतिम फेरीत; आता गाठ न्यूझीलंडशी

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत इंग्लंडला रविवारी न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे.


ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे २२४ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यावेळी इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअसस्टोव यांनी १२४ धावांची दमदार सलामी दिली. बेअसस्टोव यावेळी ३४ धावांवर बाद झाला. जेसन हा अधिक आक्रमक खेळत होता. पण सदोष पंचगिरीचा फटका त्याला बसला, नाहीतर त्याचे शतक या सामन्यात पाहायला मिळाले असते. जेसनने ६५ चेंडूंत ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ८५ धावांची खेळी साकारली. जेसन बाद झाल्यावर जो रुट आणि इऑन मॉर्गन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 
यापूर्वी, स्टीव्हन स्मिथच्या ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २२३ धावा करता आल्या. स्मिथला यावेळी यष्टीरक्षक कॅरीची चांगली साथ मिळाली. कॅरीने जबड्याला दुखापत होऊनही ४६ धावांची खेळी साकारली.

पंचांनी ढापला आणि त्याचे शतक हुकले
दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु आहे. या सामन्यात सदोष पंचगिरीचा फटका इंग्लंडला बसल्याचे पाहायला मिळाले. पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे इंग्लंडच्या फलंदाजाचे शतक हुकल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची पिसे काढत होता. स्टीव्हन स्मिथला तर त्याने चक्क तीन षटकार लगावले. आता जेसन शतक झळकावणार, असा त्याचा फॉर्म सांगत होता. पण पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जेसनला माघारी परतावे लागले.

इंग्लंडने यापूर्वीच एक रीव्ह्यू घेतला होता, तो अपयशी ठरल्यामुळे त्यांच्याकडे दुसरी संधी नव्हती. जेव्हा जेसनचा झेल पकडला गेला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी त्याला आऊट दिले. पण जेसन खेळपट्टीवरून हलायला तयार नव्हता. पण अखेर त्याला माघारी परतावे लागले. तो माघारी परतत असताना मैदानात हा चेंडू पुन्हा एकदा दाखवण्यात आला. त्यावेळी चेंडू बॅटला लागला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरही निराश जेसनला माघारी परतावे लागले.
इंग्लंडचा भरवश्याचा फलंदाज जो रूटने एक धाव न करताही वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड नेमका आहे तरी काय, ते जाणून घ्या...

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २२३ धावांवर रोखले. या सामन्यात रूटने पॅट कमिन्सचा एक झेल पकडला. हा झेल पकडत रुटने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. कारण एका विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रुटच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने २०१३ साली झालेल्या विश्वचषकात ११ झेल पकडले होते. या विश्वचषकात रुटने १२ झेल पकडल्या आहेत.

अ‍ॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला अन् रक्त वाहू लागले
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्यानं ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी ऑसींना धक्के देत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी केली. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि अ‍ॅलेक्स केरी यांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. डावाच्या आठव्या षटकात ऑसींना आणखी एक मोठा धक्का बसता बसता राहीला.

आर्चरने टाकलेल्या आठव्या षटकातील उसळी घेणारा चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि त्याला दुखापत झाली. चेंडूचा वेग इतका होता की केरीच्या जबड्यावरील कातडी सोलली गेली अन् रक्त वाहू लागलं. केरीच्या जबड्यातून वाहणारं रक्त पाहून ऑसींच्या गोटात चिंता पसरली होती. केरीला तातडीनं वैद्यकीय मदत करण्यात आली. जबड्यावर पट्टी लावून त्यानंतर केरी मैदानावर खेळत राहिला. 

Web Title: ICC World Cup 2019: England beat Australia in semi final and enter in final of WC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.