#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...

बुधवारी सोशल मीडियावर अचानक #MissYouYuvi हे ट्रेंड झाले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:53 AM2020-06-11T11:53:47+5:302020-06-11T11:54:39+5:30

whatsapp join usJoin us
How Hazel Keech reacted to #MissYouYuvi trend,Proud to stand beside you in life | #MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...

#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बुधवारी सोशल मीडियावर अचानक #MissYouYuvi हे ट्रेंड झाले होते. 10 जून 2019 मध्ये युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि काल त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे चाहत्यांना युवीची आठवण सतावत होती. चाहत्यांचं प्रेम पाहून युवीही भारावला आणि त्यानं त्यांच्यासाठी खास ट्विट केलं. निवृत्तीनंतरही युवीची लोकप्रियता कमी झालेली नाही. लोकांचं युवीवरील प्रेम पाहून पत्नी हेझल किच हिनंही पोस्ट लिहिली.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने टीम इंडियाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयात युवीचा सिंहाचा वाटा होता. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळे युवीच्या निवृत्तीच्या वर्षपूर्तीनिमित्त चाहत्यांनी #MissyouYuvi हा ट्रेंड सुरू केला. त्यांचं प्रेम पाहून युवीनं लिहिलं की,''आज तुमच्याकडून मिळालेलं प्रेम पाहून मी भारावलो. आजचा दिवस खास आणि अविस्मरणीय केल्याबद्दल सर्वांचे आभार.  तुम्ही मला नेहमीच पाठींबा दिला आहात, विशेषतः माझ्या कठीण काळात...''


हेझलनं लिहिलं की,''मैदानावर अन् खऱ्या आयुष्यातही तू हिरो आहेस. या देशासाठी तू जे काही केलं आहेस, त्याचा मला अभिमान वाटतो. #MissYouYuvi या ट्रेड हेच सांगतो की, जगभरातील चाहत्यांसाठी तू अजूनही प्रेरणआस्रोत आहेस. तुझ्या आयुष्यात तुझ्यासोबत उभी राहण्याचा मला अभिमान वाटतो.''

 

IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र

भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर

क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगली क्रिकेट मॅच; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला Video लाखोंनी पाहिला

Web Title: How Hazel Keech reacted to #MissYouYuvi trend,Proud to stand beside you in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.