‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा सल्ला

तेंडुलकर यांचा गोलंदाजांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 02:00 AM2020-11-25T02:00:23+5:302020-11-25T02:01:04+5:30

whatsapp join usJoin us
‘Hit Smith on the fifth stump’ | ‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा सल्ला

‘स्मिथला पाचव्या स्टम्पवर मारा करा’, सचिनचा सल्ला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : स्टीव्ह स्मिथच्या अपारंपरिक शैलीमुळे भारतीय गोलंदाजांना यष्टीच्या थोडा बाहेर मारा करावा लागेल, असे महान फलंदाज सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. सचिनने भारतीय वेगवान गोलंदाजांना सल्ला दिला की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान या फलंदाजाला पाचव्या स्टम्पच्या लाईनवर गोलंदाजी करावी. चेंडू छेडखानी प्रकरणामुळे भारत-आॉस्ट्रेलिया २०१८-१९ च्या गेल्या मालिकेत बाहेर राहिलेला स्मिथ यावेळी भरपाई करण्यास सज्ज आहे. स्मिथने भारताविरुद्ध सहा कसोटी शतके झळकावली आहेत.

तेंडुलकर म्हणाला, ‘स्मिथचे तंत्र अपारंपरिक आहे. साधारणपणे कसोटी सामन्यात आपण गोलंदाजाला उजवी यष्टी किंवा चौथ्या स्टम्पच्या लाईनने गोलंदाजी करण्यात सांगतो, पण स्मिथ मूव्ह करतो. त्यामुळे कदाचित चेंडू लाईनपेक्षा चार ते पाच इंच आणखी पुढे असायला हवा. स्टीव्हच्या बॅटची कड घेण्यासाठी चौथ्या किंव्या पाचव्या स्टम्पच्या लाईनमध्ये गोलंदाजी करण्याचे लक्ष्य असायला हवे. जास्त काही नाही तर लाईन व मानसिकता बदलायची आहे.’ तेंडुलकरने पुढे म्हटले की, ‘स्मिथ आखूड टप्प्याच्या माऱ्यासाठी सज्ज आहे, असे मी वाचले, पण गोलंदाज सुरुवातीपासून  आक्रमक पवित्रा स्वीकारतील, अशी आशा आहे.’

n आक्रमक गोलंदाजासह धावा रोखणाऱ्या गोलंदाजाची ओळख करायला हवी. दिवस-रात्र कसोटीत हा गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
n दिवसाच्या पहिल्या सत्रात वेगाने धावा काढाव्या लागतील.
n सायंकाळ झाल्यानंतर गुलाबी चेंडू अधिक सीम होतो.
n खेळपट्टी थंड असेल त्यावेळी बळी घेणे सोपे असते.
n मयांकचे खेळणे निश्चित भासत आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांमध्ये स्मिथ, वॉर्नर व लाबुशेन महत्त्वाचे असतील.
n बॉर्डर-गावसकर ट्रॉफी राखण्याची भारताला चांगली संधी.
n विराटच्या अनुपस्थितीत अन्य खेळाडूंना छाप सोडण्याची संधी.
n भारताची बेंच स्ट्रेंथ दमदार. कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेची उपस्थिती महत्त्वाची ठरेल.

 

Web Title: ‘Hit Smith on the fifth stump’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.