मुंबई : बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्यांना 40 लाख रुपये एवढे मानधन दिले होते. पण रामचंद्र गुहा यांनी ही रक्कम बीसीसीआयला परत केली आहे. विक्रम लिमये यांनी देखील आपले मानधन बीसीसीआयला परत केल्याचे वृत्त आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयमधील कारभार स्वच्छ करण्यासाठी प्रशासकीय समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये राय, एडल्जी यांच्यासह विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांचा समावेश होता.
![Ramachandra Guha declines to receive Rs. 40 Lakh as CoA Member Salary | इतिहासकार रामचंद्र गुहा ने BCCI से 40 लाख रुपये सैलरी लेने से किया मना, CoA सदस्य के रूप में किया था काम]()
बीसीसीआयने प्रशासकीय समितीला 2017 साली 10 लाख, 2018 साली 11 लाख आणि 2019 साली 12 लाख रुपये प्रति महिने मानधन दिले होते. त्यानुसार या दोघांना आतापर्यंत जवळपास साडे तीन कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळाले आहेत.
करोडो रुपये कमावून विनोद राय आणि डायना एडल्जी बीसीसीआय सोडणार
मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अध्यक्षपद आज स्वीकारले. गांगुली अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील विनोद राय आणि डायना एडल्जी आपले पद सोडणार आहेत. पण बीसीसीआयमधून बाहेर पडताना हे दोघेही करोडपती झाले आहेत.
बीसीसीआयची प्रशासकीय समिती ही जवळपास 30 महिने कार्यरत होती. पण काही महिन्यांपूर्वी विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांनी प्रशासकीय समितीला रामराम ठोकला होता. त्यानंतर राय आणि एडल्जी यांनीच ही समिती सांभाळली होती.
बीसीसीआयने प्रशासकीय समितीला 2017 साली 10 लाख, 2018 साली 11 लाख आणि 2019 साली 12 लाख रुपये प्रति महिने मानधन दिले होते. त्यानुसार या दोघांना आतापर्यंत जवळपास साडे तीन कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळाले आहेत.