He proposes to her on the field and then ... | त्याने तिला मैदानात प्रपोज केलं आणि त्यानंतर चक्क...
त्याने तिला मैदानात प्रपोज केलं आणि त्यानंतर चक्क...

ती मैदानात खेळत होती. तिच्या संघाने सामना जिंकला. सामना जिंकल्यावर ती सेलिब्रेशन करत होती. सर्व संघच आनंदात होता. मैदानात ती नाटत आनंद व्यक्त करत होती. त्यावेळी तो मैदानात आला. तो चालत तिच्याजवळ पोहोचला. तिनेही त्याला बघितलं. ती संघाबरोबर होती. त्याला पाहून ती त्याच्या जवळ आली. यावेळी त्याने तिला प्रपोज केलं आणि त्यानंतर त्याने असं काही केलं की...

ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियामधली. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिलांची बिग बॅश लीग सुरु आहे. या लीगमधील अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून ती खेळत होती. हा सामना अॅडलेडच्या संघाने जिंकला. संघानंतर संघाबरोबर सेलिब्रेशन करत असताना तिला एका मुलाने प्रपोज केलं.अॅडलेड संघातील या महिला खेळाडूचं नाव आहे अमांडा जेड वेलिंग्टन. अमांडाने 2016 साली ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले आहे. अमांडाने आतापर्यंत आठ T-20 , 12 वनडे आणि एक कसोटी सामना खेळली आहे.

अमांडाला नेमका कोणता तरुण भेटायला आला, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. तो तरुण अमांडाचा बॉयफ्रेंड टेलर मेकचिन होता. संघाचे सेलिब्रशेन सुरु असताना त्याने अमांडाला रिंग देऊन प्रपोज केले आणि त्यानंतर किसही केलं.


Web Title: He proposes to her on the field and then ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.