हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक अंदाजावर होणाऱ्या सासुबाईंनी केलं लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 12:17 IST2020-05-14T12:17:09+5:302020-05-14T12:17:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya's Romantic Reply To Natasa Stankovic's Quarantine Question Makes Her Blush svg | हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

हार्दिक पांड्याच्या रोमँटिक उत्तरानं नताशा लाजली; TikTok व्हिडीओतून व्यक्त केल्या भावना

लॉकडाऊनमुळे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांना क्वालिटी टाईम घालवण्यास मिळत आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक आणि नताशा सोशल मीडियावरून आपापल्या चाहत्यांसोबत गप्पा मारत आहेत. लॉकडाऊनमध्ये नताशा पांड्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या घरीच राहत आहे. त्यामुळे या दोघांना एकमेकांना समजण्यास मदत होत आहे. नताशानं बुधवारी इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला. त्यावर हार्दिकचं रोमँटिक उत्तर पाहून ती लाजली आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून एक TikTok व्हिडीओ अपलोड केला.

मोहम्मद शमीला पत्नी हसीन जहाँमुळे मोठा धक्का; यंदाही मिळणार नाही अर्जुन पुरस्कार 

Photos : विराट-अनुष्काचे मुंबईतील घर पाहिलेत का? चला करूया सफर!

 जगायचं तरी कसं? लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या खेळाडूवर उपासमारीची वेळ

नताशानं तुमचा क्वारंटाईन कसा चालला आहे, असा प्रश्न विचारला..


त्यावर हार्दिकनं रोमँटिक उत्तर दिलं. माझा क्वारंटाईन बेस्ट व्यक्तीसोबत आहे, असं हार्दिकनं रिप्लाय दिला. नताशाची आई रॅडमिला स्टँकोविच यांनीही हार्दिकच्या रिप्लायवर लाईक्स ठोकला.  

हार्दिकच्या या रिप्लायला नताशानंही रोमँटिक स्टाईलमध्ये रिप्लाय दिला. तिनं साखरपुड्याच्या फोटोंसह एक टिकटॉक व्हिडीओ बनवला.
 


 

Web Title: Hardik Pandya's Romantic Reply To Natasa Stankovic's Quarantine Question Makes Her Blush svg