भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या टी-२० संघातील प्रमुख सदस्य आहे. वर्षभरात त्याने फलंदाजीसह गोलंदाजीत धमक दाखवून दिली आहे. आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील वनडेत त्याने टी-२० स्टाईलमध्ये धमाकेदार खेळीसह लक्षवेधून घेतले आहे. राजकोटच्या मैदानातील निरंजन शहा स्टेडियमवर बडोदा विरुद्ध चंदीगड यांच्यातील सामना रंगला आहे. या सामन्यात थोरला भाऊ क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाकडून हार्दिक पांड्याने मोठा धमाका केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
याआधीच्या सामन्यात धमाकेदार खेळी करणारा क्रुणाल पांड्या चंदीगड विरुद्धच्या सामन्यात अवघ्या २० धावा करून बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजी करताना १९ चेंडूत अर्धशतक साजरे केले. २४१.९४ च्य़ा स्ट्राईक रेटसह हार्दिक पांड्याने या सामन्यात ३१ चेंडूत२ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली.
Video: "हे चुकीचं आहे रे..."; रोहित शर्मा चिडला, लहान मुलीच्या आईवडिलांना चांगलंच सुनावलं!
'बडे मियाँ'च्या संघासाठी महत्त्वाचा सामना; त्यात 'छोटे मियाँ'नं दाखवला रुबाब
राजकोटच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात बडोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १२३ धावांवर बडोदा संघाने चार विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर फलंदाजीस आलेल्या हार्दिक पांड्याने चंदीगडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ ग्रुप-बी मधून नॉकआउट फेरीत पोहोचण्यासाठी क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने कडक खेळी केली.
हार्दिक पांड्याशिवाय या तिघांनी केली दमदार खेळी
हार्दिक पांड्याशिवाय प्रियांशु मोलियाने या सामन्यात १०६ चेंडूत ११३ धावांची शतकी खेळी साकारली. विष्णू सोलंकी आणि जितेश शर्माच्या बॅटमधूनही अर्धशतक आले. या चौघांच्या खेळीच्या जोरावर बडोदा संघाने ४९.१ षटकात ३९१ धावा करत चंदीगडोमर ३९२ धावांचे आव्हान ठेवले आहे.