पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि ट्वेंटी-20 मालिकेत संघाने 3-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 17:35 IST2019-08-10T17:35:19+5:302019-08-10T17:35:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya and brother Krunal Pandya sing Why This Kolaveri on karaoke night. Watch viral video | पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

पांड्या बंधुंचा शायराना अंदाज; हार्दिक-कृणाल यांना सतावतोय हा प्रश्न!

बडोदा : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे आणि ट्वेंटी-20 मालिकेत संघाने 3-0 असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या या दौऱ्यातील एकाही संघाचा सदस्य नाही, तर कृणालला ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाले होते. त्यानं या मालिकेत 3 विकेट्स आणि 67 धावा केल्या. ट्वेंटी-20 मालिका संपवून कृणाल मायदेशी परतला आणि त्यानंतर कृणाल व हार्दिक या पांड्या बंधुंची जुगलबंदी पाहायला मिळाली. आठ वर्षांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकुळ घातलेल्या 'व्हाय दिस कोलावरी डी' हे गाणं पांड्या बंधूंनी गायलं.

हार्दिक आणि कृणाल यांनी त्यांच्या मित्रांसोबत एक पार्टी आयोजित केली होती. त्यात पांड्या बंधुंनी कराओके सेशनमध्ये सहभाग घेतला. त्यात या दोघांनी कोलावरी डी हे गाण गायलं आणि दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 पाहा व्हिडीओ...

Web Title: Hardik Pandya and brother Krunal Pandya sing Why This Kolaveri on karaoke night. Watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.