इम्रान खान यांच्या भाषणावरून हरभजन सिंग अन् विणा मलिक यांच्यात तू तू मै मै

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक भाषण दिले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:21 PM2019-10-08T14:21:27+5:302019-10-08T14:26:56+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh, Veena Malik engage in war of words on Imran Khan's UNGA speech | इम्रान खान यांच्या भाषणावरून हरभजन सिंग अन् विणा मलिक यांच्यात तू तू मै मै

इम्रान खान यांच्या भाषणावरून हरभजन सिंग अन् विणा मलिक यांच्यात तू तू मै मै

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये एक भाषण दिले होते. या भाषणानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग यांनी इम्रान यांच्यावर जोरदार टीका केली होती. सेहवागने आपल्या ट्विटरवर इम्रान यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये एक टीव्ही अँकर इम्रान यांच्यावर टीका करत होती. पण, भज्जीची ही टीका अभिनेत्री विणा मलिकला आवडलेली नाही. तिनं भज्जीवर टीका केली.

हरभजनने ट्विट केले की,''UNGA ला केलेल्या भाषणात इम्रान खान यांनी रक्तपात करण्याची भाषा केली. त्यांच्या या भाषणातून दोन्ही देशांमधील द्वेश अधिक वाढणार आहे. एक खेळाडू म्हणून मी त्यांच्याकडून शांतीच्या प्रस्तावाची  अपेक्षा करत होतो.'' 
त्यावर विणा मलिकनं भज्जीला डिवचलं. ती म्हणाली,''पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणातून शांतीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सत्य आणि भिषण यातील वास्तव सांगितले. ( भज्जी) तुला कदाचीत इंग्रजी कळलं नसावं.'' भज्जीनंही तिला सडेतोड उत्तर देत, पुढच्या वेळेस ट्रोल करण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला. 


इम्रान खान हे तर दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले; मोहम्मद कैफचा जोरदार हल्ला
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. इम्रान खान हे दहशतवादी आणि पाकिस्तनच्या हातातील कळसूत्रीचे बाहुले आहे, अशी जहरी टीका कैफने केली आहे. कैफने रविवारी एका लेखावर आपले मत मांडताना एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये कैफने इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये कैने म्हटले आहे की, " पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आहे. इम्रान खान तुम्ही एक महान क्रिकेटपटू होतात, पण सध्याच्या घडीला तुम्ही दहशतवादी आणि पाकिस्तानच्या आर्मीच्या हातातील बाहुले झालेले आहात. तुम्ही स्वत:ची छबी खराब करत आहात."

Web Title: Harbhajan Singh, Veena Malik engage in war of words on Imran Khan's UNGA speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.