सोशल मीडियावर सध्या एका मुलाचा डान्स तुफान व्हायरल होत आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्यानं लिहिलं की,''साबण लावता लावता डान्स कसा करावा, ते शिका.'' व्हिडीओतील मुलगा ज्या प्रकारे डान्स करतोय, ते पाहून खरंच तो शरिरावर साबण लावता लावता डान्स करतोय असं वाटतं. हा व्हिडीओ पाहून भज्जी नक्की लोटपोट झाला असेल.
20 सेकंदाच्या व्हिडीओत तो मुलगा ढोल ताशाच्या तालावर बेभान होऊन नाचत आहे. त्यात एक महिला हाताता पैसे घेऊन त्याची आरती ओवाळायला येते, पण तो एवढा बेभान होता की त्यानं जे केलं, ते पाहून सर्वांना हसू आवरता आले नाही. हा व्हिडीओ फार जूना आहे, परंतु भज्जीनं तो शेअर केल्यांनं पुन्हा त्याची हवा झाली आहे.  आतापर्यंत 30 हजाराहून अधिका लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी  
हरभजन सिंगनं चीनवर टीका केली आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त केला आहे. भज्जीनं ट्विट केलं की,''जगभरात कोरोना व्हायरस पसरवण्याचा त्यांचा प्लान होता. संपूर्ण जग या संकटाशी लढतंय आणि चीन आनंदात जगत आहे. PPE किट, मास्क तयार करून जगाला विकत आहेत. स्वतःची आर्थिक परिस्थिती बळकट करत आहेत.''
OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!
WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली