शोएब अख्तरनं मागितलेली वर्ल्डकप फायनलची तिकीटं; हरभजननं केली होती बोलती बंद!

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्याकडे सामन्याची तिकीटं मागितली होती. हरभजननं तिकीटं दिलीही पण त्यानंतर काय केलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 09:20 PM2021-04-03T21:20:17+5:302021-04-03T21:21:11+5:30

whatsapp join usJoin us
harbhajan singh replay on shoaib akhtar asked for the world cup 2011 final match ticket | शोएब अख्तरनं मागितलेली वर्ल्डकप फायनलची तिकीटं; हरभजननं केली होती बोलती बंद!

शोएब अख्तरनं मागितलेली वर्ल्डकप फायनलची तिकीटं; हरभजननं केली होती बोलती बंद!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघांमधल्या खेळाडूंमध्ये मैदानात कितीही द्वंद्व पाहायला मिळत असलं तरी मैदानाबाहेर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये चांगली मैत्री देखील आपण पाहिली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये असलेल्या मैत्रीची उदाहरणं देखील आहेत. अशीच एक घटना २०११ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीवेळी घडली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यानं भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याच्याकडे सामन्याची तिकीटं मागितली होती. हरभजननं ती दिलीही होती. 

उपांत्य फेरीनंतर वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम फेरीचीही तिकीटं शोएब अख्तरनं मागितली. त्यावर हरभजननं शोएब अख्तरला खोचक टोला लगावून त्याची बोलतीच बंद केली होती. पाकिस्तानवर मात देऊन भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता आणि भारताची अंतिम फेरीतील लढत २ एप्रिल रोजी श्रीलंकेविरोधात झाली होती. 

पाकिस्तान फायनल खेळत नाही
हरभजननं सांगितलं की शोएब अख्तरनं उपांत्य फेरीची तिकीटं मागितली होती आणि ती मी दिलीही होती. पण शोएबनं नंतर फायनलचीही तिकीटं मागितली होती आणि त्यावर हरभजननं मजेशीर उत्तर दिलं होतं. "२०११ च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीआधी माझी शोएब अख्तरशी भेट झाली होती. त्यावेळी त्यानं माझ्याकडे सामन्याची तिकीटं मागितली होती. मी कसंबसं चार तिकीटं त्याला मिळवून दिली होती. त्यानंतर त्यांनं माझ्याकडे अंतिम फेरीचीही तिकीटं मागितली. मी त्याला म्हटलं की अंतिम फेरीचं तिकीट घेऊन तू काय करणार? भारत अंतिम सामना खेळणार आहे आणि तुला सामना पाहायला असेल तर २-४ तिकीटं देतो. शोएब अख्तर उपांत्य फेरीचा सामना खेळला नव्हता आणि आम्ही सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचलो होतो", असं हरभजन म्हणाला. 

Web Title: harbhajan singh replay on shoaib akhtar asked for the world cup 2011 final match ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.