कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून माहीला शुभेच्छा दिल्या आहेत. पण, वेस्ट इंडिजचा स्टार आणि चेन्नई सुपर किंग्सचा सहकारी ड्वॅन ब्राव्होनं यानं धोनीला आगळवेगळं गिफ्ट दिलं आहे. धोनीच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टर साँग रिलीज केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सनं 2011मध्ये ब्राव्होला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. पण, त्यावर्षी तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. ब्राव्हो हा चेन्नई सुपर किंग्सचा हुकुमी एक्का आहे आणि डू अँड डाय परिस्थितीत धोनी त्याच्याकडे जबाबदारी सोपवतो. त्यामुळे दोघांमधली बाँडिंगही तितकीच चांगली आहे. ब्राव्होनं आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ससाठी 104 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्राव्होनं आज रिलीज केलेल्या गाण्यात धोनीने जिंकलेल्या तीनही आयसीसी स्पर्धांचा उल्लेख केला आहे. त्याशिवाय हेलिकॉप्टर शॉटचेही वर्णन आहे. त्यानं लिहिलं की,''धोनी, तू अनेकांसाठी आदर्श आहेस. तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे हेलिकॉप्टर साँग तुला भेट देत आहे.''
पाहा व्हिडीओ...
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...
काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र