दोन इंजेक्शन अन् वेदनाशामक औषध घेऊन मैदानावर उतरला रिषभ पंत; सिडनी कसोटीतील ९७ धावांमागची गोष्ट!

सिडनी कसोटीत ४०७ धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३६ षटकांत १०२ धावांवर माघारी परतले होते. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाले होते.

By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 11:59 AM2021-01-24T11:59:30+5:302021-01-24T12:00:30+5:30

whatsapp join usJoin us
Had taken 2 injections and sedatives before batting but I could have won the Sydney Test: Rishabh Pant | दोन इंजेक्शन अन् वेदनाशामक औषध घेऊन मैदानावर उतरला रिषभ पंत; सिडनी कसोटीतील ९७ धावांमागची गोष्ट!

दोन इंजेक्शन अन् वेदनाशामक औषध घेऊन मैदानावर उतरला रिषभ पंत; सिडनी कसोटीतील ९७ धावांमागची गोष्ट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरिषभनं भारताकडून ३ सामन्यांत सर्वाधिक २७४ धावा केल्या. सिडनी कसोटीत ९७ आणि ब्रिस्बेन कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ऐतिहासिक मालिका विजयाच्या नायकांमध्ये रिषभ पंत ( Rishabh Pant) हे नाव आवर्जुन घ्यायला हवं. गॅबा कसोटीत रिषभनं नाबाद ८९ धावांची खेळी करून टीम इंडियाला २-१ असा विजय मिळवून दिला. ब्रिस्बेन कसोटीतील मॅच विनिंग खेळीपूर्वी रिषभनं सिडनी कसोटीत ९७ धावांची खेळी केली होती आणि तो खेळपट्टीवर असता, तर कदाचित भारतानं हा सामना जिंकलाही असता.  36 All Out नंतर विराट कोहलीनं मध्यरात्री १२.३० वाजता पाठवला मॅसेज अन् असे ठरले 'मिशन मेलबर्न'! 

सिडनी कसोटीत ४०७ धावांचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३६ षटकांत १०२ धावांवर माघारी परतले होते. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाले होते. त्यानंतर रिषभनं चेतेश्वर पुजारासह ऑसी गोलंदाजांचा समाचार घेतला. रिषभनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकार खेचून ९७ धावा केल्या. कोपऱ्याला दुखापत होऊनही रिषभ मैदानावर उतरला होता. कसोटीच्या पहिल्या डावात पॅट कमिन्सच्या बाऊन्सरवर त्याला ही दुखापत झाली होती. त्यानंतर तो यष्टिरक्षणाला उतरला नव्हता. तो फलंदाजीला येईल की नाही, याबाबतही संभ्रम होते. टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार!

पण, दोन इंजेक्शन व पेन किलर खाऊन तो दुसऱ्या डावात फलंदाजीला मैदानावर उतरला आणि तुफान खेळी केली. मैदानावर असेपर्यंत हा सामना जिंकून देऊ, असा विश्वास रिषभला वाटत होता. पण, ९७ धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर आर अश्विन व हनुमा विहारी यांनी अभेद्य भींत उभी करून सामना अनिर्णीत राखला.  शिखर धवन कायद्याच्या कचाट्यात सापडणार?; स्वतःहून दिलं संकटाला आमंत्रण

रिषभ म्हणाला,''सिडनी कसोटीच्या अखेरच्या दिवशी ९७ धावांची खेळी केल्यानंतर आम्ही सामना जिंकू असे वाटले होते. मैदानावर उतरण्यापूर्वी मी दोन इंजेक्शन घेतली होती आणि वेदनाशामक औषध खाल्लं होतं. मला ही संधी सोडायची नव्हती. ब्रिस्बेन कसोटीत मला अखेरपर्यंत खेळून सामना जिंकायचा होता आणि ही संधी मी सोडली नाही.''
ब्रिस्बेन कसोटीत विजयी चौकार खेचून रिषभनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टीम इंडियाला मिळवून दिली. या सामन्यात रिषभनं नाबाद ८९ धावा केल्या आणि शुबमन गिलनं ९१ धावा चोपल्या. या मालिकेत रिषभनं भारताकडून ३ सामन्यांत सर्वाधिक २७४ धावा केल्या. 

Web Title: Had taken 2 injections and sedatives before batting but I could have won the Sydney Test: Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.