टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार!

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडनं पहिल्या कसोटीत ७ विकेट राखून विजय मिळवला. कर्णधार जो रूटनं खणखणीत द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या कसोटीतही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 10:36 AM2021-01-24T10:36:47+5:302021-01-24T10:37:41+5:30

whatsapp join usJoin us
Kevin Pietersen shares Rahul Dravid’s email to help Dom Sibley and Zak Crawley play against spinners | टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार!

टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वी इंग्लंडचे फलंदाज 'द्रविड' गुरुजींनी दिलेला अभ्यास करणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटीतील विजयानंतर दुसऱ्या सामन्यातही जो रूटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने मजबूत पकड घेतली आहे. लंकन दौऱ्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात चार कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी लोळवून टीम इंडिया मायदेशी परतली आहे आणि संघातील प्रमुख खेळाडूही पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहेत. त्यात टीम इंडिया घरच्या मैदानावर खेळणार असल्यानं त्यांची ताकद अधिक वाढली असेलच, यामुळेच आता इंग्लंडचे माजी खेळाडू सध्याच्या टीमला मदत करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. माजी खेळाडूनं फिरकी गोलंदाजांना चाचपडणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांसाठी राहुल द्रविडचा अभ्यासक्रम पाठवला आहे.

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडनं पहिल्या कसोटीत ७ विकेट राखून विजय मिळवला. कर्णधार जो रूटनं खणखणीत द्विशतक झळकावले आणि दुसऱ्या कसोटीतही तो शतकाच्या उंबरठ्यावर आहे. पण, या मालिकेत इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व डॉमिनिक सिब्ली हे सलामीवीर फिरकी गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले आणि ही बाब इंग्लंड संघाची चिंता वाढवणारी आहे. डावखुरा फिरकीपटू लसिथ इम्बुलडेनियासोर हे दोघेही अपयशी ठरले. कसोटीच्या तीनही डावांत लसिथनं इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. या मालिकेत झॅकनं आतापर्यंत २२, तर सिब्लीनं ६ धावा केल्या आहेत.  

फिरकी गोलंदाजांचा सामना करणाऱ्या चाचपडणाऱ्या इंग्लंडच्या सलामीवीरांच्या मदतीला माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) धावून आला आहे. त्यानं सिब्ली व झॅक यांच्यासाठी भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचा अभ्यासक्रम पाठवला आहे. पीटरसन जेव्हा फिरकी गोलंदाजांचा सामना करताना चाचपडत होता, त्यावेळी द्रविडनं त्याला मेलद्वारे काही सूचना केल्या होत्या. त्याचा पीटरसनला भविष्यात बराच फायदा झाला. तोच मेल पीटरसननं इंग्लंडच्या सलामीवीरांना पाठवला आहे. ''फिरकी गोलंदाजांना कसे सामोरे जावे, याबाबतचा मेल मला राहुल द्रविडनं पाठवला होता आणि तोच झॅक व सिब्ली यांना पाठवण्यासाठी शोधत आहे. त्या मेलनं माझा खेळच बदलला होता.'' 


पीटरसननं पुढील ट्विटमध्ये दोन पानांचं पत्र पोस्ट केले आहे. त्यात द्रविडनं फिरकीचा कसा सामना करावा, याबाबत सूचना दिल्या होत्या. पीटरसननं म्हटलं की, इंग्लंड क्रिकेट बोर्ट या पानांची प्रिंट आऊट काढा आणि झॅक व सिब्ली यांना द्या. त्यांना गरज वाटल्यास मला कॉलही करू शकता. 

 

Web Title: Kevin Pietersen shares Rahul Dravid’s email to help Dom Sibley and Zak Crawley play against spinners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.