Good News : Update on MS Dhoni's possible date of return to international cricket | खूशखबर : महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली

खूशखबर : महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाची तारीख ठरली

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप स्पर्धेनंतर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यानं वेस्ट इंडिज दौरा आणि मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. पण, या सर्व अफवा असल्याचे धोनीची पत्नी साक्षीनं स्पष्ट केले होतेच.. आता सूत्रांच्या माहितीनुसार धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची तारीख ठरवली आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीनं रिषभ पंतला प्राधान्य दिले. मात्र, पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह निवड समितीनंही पंतला अखेरचा इशारा दिला आहे. निवड समितीनं आता पंतला पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्धार घेतला आहे. अशा परिस्थितीत धोनीला पुन्हा बोलवा अशीची मागणी जोर धरू लागली आहे.

आता धोनी नोव्हेंबरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  धोनीनं क्रिकेटपासूर आणखी काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला असून तो विजय हजारे चषक आणि बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेलाही मुकणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यातील मालिकेतून धोनी पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्ला
भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी धोनीला आता बस कर... असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले,'' महेंद्रसिंग धोनीच्या मनात नेमकं काय आहे, हे कुणालाही माहित नाही. भारतीय संघातील त्याच्या भविष्याबद्दल तोच सांगू शकतो, परंतु मला वाटतं तो आता 38 वर्षांचा आहे आणि टीम इंडियानं पुढील विचार करायला हवा. कारण, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंत धोनी 39 वर्षांचा होईल.'' 


''धोनीचं संघासाठीच्या योगदानाचा मुल्यमापन कुणीच करू शकत नाही. केवळ धावाच नव्हे, तर यष्टिंमागूनही त्यानं संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. संघात त्याचं असणे हे केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर कर्णधाराच्याही फायद्याचे असते. त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुणाचा संघालाच फायदा मिळतो. पण, आता ती वेळ आली आहे,'' असे गावस्कर यांनी पुढे स्पष्ट केले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good News : Update on MS Dhoni's possible date of return to international cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.