Glenn Maxwell did a engagement with Indian-origin girlfriend Vini Raman prl | Breaking News :ग्लेन मॅक्सवेलने केला भारताच्या 'या' सेलिब्रेटीबरोबर साखरपुडा

Breaking News :ग्लेन मॅक्सवेलने केला भारताच्या 'या' सेलिब्रेटीबरोबर साखरपुडा

आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे अनेकांच्या गळ्यातील ताइत झालेला ऑस्ट्रेलियाचा तडफदार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा आज साखरपुडा झाला. भारताच्या एका सेलिब्रेटीबरोबर त्याने आज साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे.

मॅक्सवेलने आज आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मॅक्सवेल आणि ही सेलिब्रेटी दिसत आहे. या फोटोमध्ये या सेलिब्रेटीच्या बोटामध्ये अंगठी दिसत असून तिच्याबरोबर मॅक्सवेलही उभा आहे. मॅक्सवेलने हा फोटो पोस्ट केल्यावर तो चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळाला आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मॅक्सवेल या सेलिब्रेटीबरोबर डेटिंगला जात आहे. हे दोघे एकमेकांचे फोटो लाईक आणि शेअरही करत आहेत. आता मॅक्सवेलबरोबर डेटिंग करणारी सेलिब्रेटी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या सेलिब्रेटीचे नाव आहे विनी रमण. या दोघांनी आज साखरपुडा केला असून आपला फोटो सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

ग्लेन आणि विनी यांचे बरेच फोटो आतापर्यंत वायरल झाले आहेत. फोटोंमध्ये ग्लेन आणि विनी यांच्यामधील जवळीक त्यांचे नाते सांगून जात आहे. आता हे दोघे साखरपुड्यानंतर लग्न कधी करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Web Title: Glenn Maxwell did a engagement with Indian-origin girlfriend Vini Raman prl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.